श्री बृहन्मठ होटगी मठाच्यावतीने उद्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 21, 2025

श्री बृहन्मठ होटगी मठाच्यावतीने उद्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम

 श्री बृहन्मठ होटगी मठाच्यावतीने उद्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम



सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- श्री जगद्गुरू दारूकाचार्य व एकोरामाराध्य जयंती आणि श्री वीरतपस्वी मंदिर सुवर्ण कळसारोहणानिमित्त श्री बृहन्मठ होटगी मठाच्यावतीने मंगळवार, २२ एप्रिल ते शुक्रवार, २ मेपर्यंत काशीपीठाचे जगद्गुरू श्री. श्री. श्री. १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात देव-देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, लिं. श्री चन्नबसव दररोज श्री. दानम्मा देवी पुराण शिवाचार्य स्वामीजी पुण्यतिथी, अय्याचार व दीक्षाविधी आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

होणार आहे. याचे निरूपण श्री. शंभूलिंग शास्त्रीजी गोब्बूर हे करणार आहेत. सोमवार, २८ एप्रिल ते शुक्रवार, २ मेपर्यंत श्री. श्री. श्री. १००८ जगदाचार्य मूर्तीस व गुरू गादीस रुद्राभिषेक, बुधवार, ३० एप्रिल रोजी जगद्गुरू एकोरामाराध्य जयंती उत्सव व पहाटे ६ वाजता श्री. श्री. श्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या अमृत हस्ते श्री. गणपती, देवी, नवग्रह, महामृत्युंजय, नंदी देवता प्राणप्रतिष्ठापना व शिवाचार्यांच्या उपस्थितीत अव्याचार व दीक्षाविधी कार्यक्रम, यानंतर श्री. वीरतपस्वी मंदिर सुवर्ण कळसारोहण सोहळा वेदमूर्ती परमेश्वर शास्त्री हिरेमठ व वेदमूर्ती सिध्दय्या हल्लाळी शास्त्री यांच्या वैदिकत्वाखाली संपन्न होणार आहे.

गुरुवार, १ मे रोजी सायंकाळी लिंबीचिंचोळी येथील श्री. जगद्गुरू रेवणसिध्देश्वर नंदीध्वज व मानकऱ्यांसमवेत भक्तगणांचे होटगी ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करून नंदीध्वजांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवार, २ मे रोजी श्री. श्री. श्री १००८ जगद्गुरू दारूकाचार्य जयंती व श्री चन्नबसव शिवाचार्य पुण्यतिथी यात्रा महोत्सवानिमित्त सकाळी ८ वाजता श्री. श्री. श्री. १००८ जगद्गुरु दारुकाचार्य मूर्तीची मिरवणूक महामंगलारती व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

ज्या माहेश्वर बटूंना वीरशैव बांधवांना अय्याचार व दीक्षा करून घ्यावयाची आहे, त्यांनी होटगी येथील मठामध्ये नावे नोंदवावीत. तसेच कार्यक्रमास उपस्थित राहून गुरुकृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बृहन्मठ होटगी मठाच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages