आगीबाबत कारखानदार, कर्मचारी दक्ष राहणे गरजेचे : डी. राम
सोलापूर / (कटुसत्य वृत्त):- आगीबाबत प्रत्येक कारखानदाराने आणि कर्मचाऱ्याने दक्ष राहणे गरजेचे आहे आपल्या कारखान्यामध्ये करण्यात आलेल्या विद्युत वायरिंगचे स्ट्रक्चर ऑडिट वेळेत करून घ्यावे. जेणेकरून शॉर्टसर्किट सारख्या घटना घडणार नाहीत याकरिता सर्वांनी एकजूट होऊन अग्नी सुरक्षित भारत प्रज्वलित करणे गरजेचे असल्याचे मत सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष डी. राम रेड्डी यांनी व्यक्त केले. १४ ते २० एप्रिल या अग्निशमन सेवा सप्ताह निमत्त आयोजित कार्यक्रमात रेडी हे बोलत होते.
सकाळच्या सत्रामध्ये अग्निशमन वाहनांची चिंचोली औद्योगिक वसाहतीतून अग्निप्रतिबंध जनजागृती करीत प्रभातफेरी काढण्यात आली. अग्निशमन केंद्र चिंचोली येथे कारखान्यातील पुरुष व महिला कामगार व कर्मचारी याच्या करीता फायर ड्रिल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये फायर एक्स्टिंग्यूशर ड्रिल, कीचेन फायर ड्रिल या स्पर्धेचे आयोजन केले गेले. या स्पर्धे मधे एकूण १५ कारखान्यातील ६० ते ७० पुरुष व महिला कर्मचारी सहभागी झाले होते.. यावेळी उपाध्यक्ष गणेश सूत्रावे, सोलापूर महानगरपालिका मुख्य अग्निशमन आधिकारी राकेश साळुंके, डेपुटि डायरेक्टर इडस्ट्रीयल सेफ्टी चे वकील, व्यवस्थापक शुद्धोधन बालाजी गायकवाड दिनेश रमेश अंभोरे अग्निशमन अधिकारी, जे. जे. शिंदे उप अग्निशमन अधिकारी, काकासाहेब साळुंखे, नितीन राठोड (प्रमुख अग्निशमन विमोचक ), तुषार साबळे ( अग्नि विमोचक) यांनी पर्यावरण पूरक झाडे भेट देवून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
0 Comments