Hot Posts

6/recent/ticker-posts

रोहित पवारांनी उघडपणे विरोध केला -आ.नारायण पाटील

  रोहित पवारांनी उघडपणे विरोध केला -आ.नारायण पाटील 

करमाळा (कटूसत्य वृत्त):-आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आमदार रोहित पवारांनी आम्हाला उघडपणे विरोध केला आहे. त्यांनी तसे करायला नको होते, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी केला आहे. करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्यावर आमदार नारायण पाटील यांच्या गटाची सत्ता आली आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देताना आमदार पाटील म्हणाले, आमदार रोहित पवार यांच्या जवळचे सुभाष गुळवे हे विरोधात होते. त्यामुळे त्यांचा विरोध राहिला आहे. त्यांनी आपल्या मदत करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी आम्हाला विरोध का केला, हे माहीत नाही. त्यांच्या विरोधात आपण कोणाकडे तक्रार करणार नाही. कारण आता आपण विजयी झाल्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष देणार नाही. यापुढील काळात आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत घेणार नाही. मी विरोधात असलो, तरी सहकारी संस्था टिकविण्यासाठी ते निश्चितच मदत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Reactions

Post a Comment

0 Comments