सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये एस एन डी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
नातेपुते(कटूसत्य वृत्त):-
सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनमार्फत घेतल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड व नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड परीक्षा २०२४- २५ मध्ये नातेपुते ता. माळशिरस येथील एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूल या प्रशालेतील २० विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवून यश संपादन केले तर ०४ विद्यार्थी हे राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र झाले आहेत.
यामध्ये सुस्मित गावडे, काव्या ठोंबरे, शांभवी मराळ, समृद्धी ठेंगल, श्रुतिका जाधव, ईशान ढोपे, दिशा पुरोहित, स्वराली साळुंखे आयांश मेहता, विराट कराड, आरोही भोसले, आधीरा वाघमोडे, नित्या दोशी, स्वरा केत, आयान शेख, श्रेया जठार, हर्ष शेख, रोशनी निकम, इशिता कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवत यश संपादन केले. संस्थापक अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, चेअरमन मालोजीराजे देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी विद्यार्थ्यांना स्कूलचे मुख्याध्यापक संदीप पानसरे, उपमुख्याध्यापक शकूर पटेल, पी.आर.ओ. मनोज राऊत यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना हरिदास गोरवे, सारिका पानसरे, इरफान शेख, आदित्य दाभोळे, शिजो जे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments