Hot Posts

6/recent/ticker-posts

"आम्ही बाबासाहेबांचे पाईक" या उपक्रमाचे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजन

  "आम्ही बाबासाहेबांचे पाईक" या उपक्रमाचे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजन





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहर - जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील भगरे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरु व कार्याध्यक्ष अनिल बनसोडे यांच्या वतीने नालंदा बुद्ध विहार व गणेश नगर येथे आम्ही  "बाबासाहेबांचे पाईक " या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान असलेल्या व सर्व श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या भारतीय संविधानाची उद्देशिका व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विचारांच्या जन प्रबोधन व्हावे यासाठी या उपक्रमाचे विशेषतः आयोजन करण्यात आले होते.
या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अजित दादांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी लिहिलेले पत्र आणि भारतीय उद्देशिका ही राज्यातील विविध जिल्ह्यात ,शहरात , मतदार संघात, चौका-चौकात , नाका नाक्यावर दिसली पाहिजे आणि लोकांमध्ये त्याची जनजागृती होणे महत्वाचे आहे या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
   या उपक्रमाचे उद्घाटन शहर - जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शहर - जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी जयंती निमित्त सोलापूर शहर - जिल्हा वासियांना शुभेच्छा देत राजाभाऊ बेळेनवरु व अनिल बनसोडे यांनी घेतलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.


यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार,अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख, शत्रुघ्न  कांबळे , अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्ष समदानी मत्तेखाने, अल्पसंख्यांक दक्षिण अध्यक्ष अशपाक कुरेशी,रहीम शेख , प्रसन्न शिवशरण,प्रतीक भालेकर , अश्वजीत दुपारगुडे ,प्रथमेश भालेकर, संतोष आलेगाव,बबलू दुपारगुडे शुभम मडगाम यांची उपस्थिती होती.
Reactions

Post a Comment

0 Comments