नातेपुते नगरपंचायत प्रारूप विकास
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
नातेपुते नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा संदर्भात मंगळवार, १५ एप्रिल रोजी नातेपुते येथे नगरपंचायत कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी नातेपुते नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा संघर्ष समितीने नगरपंचायतचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासमवेत प्रारूप विकास आराखड्या संदर्भात सकारात्मक चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले व विविध बदल सुचवित निवेदन दिले. प्रारूप विकास आराखडा हा पुढील ४० वर्ष गृहीत धरून केलेला आहे. परंतु २०११-१२ ला प्रादेशिक योजना लागू झाली, त्या नकाशाप्रमाणे प्रारूप विकास आराखडा लागू झाल्याने सर्वत्र रस्त्याची खिचडी होताना दिसत आहे, त्यामध्ये येलो झोन वाढवावा, नातेपुते मध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असलेले भाग, वाड्यावस्त्यांवर असलेली वसाहत येलो झोनमध्ये घेण्यात यावे.विशेषता बोराटे मळा, काळे मळा, सूर्या ढाबा नजीकची पांढरे वस्ती, राऊत वस्ती, काळे मळा, दहिगाव रोड, शंभू नगरी फोडशिरस रोड, बरडकर मळा, टेंबरे मळा, जठार वस्ती व वाढीव भागाच्या शेवटून इरिगेशनच्या हद्दीतून कालवा लगत टाकावे, पुणे-पंढरपूर रोड, दहिगाव रोड, वर्षा मेडिकल शेजारील पिरळे रोड आहे तेवढाच ठेवावा. पालखी मैदान माऊली मंदिराशेजारील रोड, सदर गट नंबर ६६१ मधून ६५८ मध्ये गेला आहे आणि तिथून थेट ६७३ गटामध्ये गेलेला आहे. यामुळे कुठेही ६७१, ६६४ बाधित होत नाही. पण नवीन प्रारूप विकास आराखड्यामध्ये रस्ता बाधित झाल्याचे दिसत आहे. त्यामध्ये बदल करून मिळावा, जुना मांडवे रोड वरील निसर्ग सिटी येथे १५ मीटरचा रस्ता दाखवला आहे त्यात सुधारणा व्हावी असे सुचविण्यात आले.
यावेळी नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. हुलगे, नगराध्यक्ष अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष अतुल (बापू) पाटील, माजी नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे, माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, नगरसेवक अॅड. बी.वाय. राऊत, रणजित पांढरे, अविनाश दोशी, अॅड. रावसाहेब पांढरे, संगीता काळे, शर्मिला चांगण, माया उराडे, नगर विकासचे समर्थ जाधव, अशोक जावरे तसेच राजकुमार हिवरकर-पाटील, किशोर पलंगे, बाबाराजे बोडरे, महावीर दोशी, प्रकाश साळवे, बाळासाहेब पांढरे हे शिष्ट मंडळ उपस्थित होते.
चौकट : २६ ठिकाणांची आरक्षणे रद्द करून शासकीय जागेवर टाकावीत
२६ ठिकाणांची आरक्षणे रद्द करून ती शासकीय जागेवर टाकावीत, ७४२, ७४३, ७४६, ७४४, ७४५ शंभू नगरीतील रस्ते गोल्डन सिटीतील रस्ते, उमाजी नाईक नगर येथील औद्योगिक झोन संपूर्णतः वगळावा, सद्गुरु कॉलनी येथील १५ मीटरचा रस्ता एक बाजूने जाणे आणि दुसऱ्या बाजूने येणे असा एकेरी पद्धतीने करावा, रिंग रोड किंवा नगरपंचायतीचे रस्ते टाकताना सर्वे नंबरचे बांध फिक्स करून मोजणी करून नंतर ते समांतर टाकावे, नव्याने बिनशेती करताना ओपन स्पेस सोडलेले आहेत, नगरपंचायतीने ते डेव्हलपमेंटसाठी घ्यावे. संघर्ष समितीला सोबत घेऊन प्रश्न मार्गी लावणार प्रारूप विकास आराखड्यासंबंधी आलेल्या अडचणी प्रारूप विकास आराखडा संघर्ष समितीला सोबत घेऊन प्रश्न मार्गी लावणार.
0 Comments