महापालिका कर्मचाऱ्यांची प्रलंबित प्रकरणे दोन महिन्यात निकाली काढणार - आयुक्त
सोलापूर(कटुसत्य वृत्त):- सोलापूर महापालिकेतील कामगार आणि कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी देताच आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही प्रकरणे येत्या दोन महिन्यात निकाली काढण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेतील सर्व कामगार संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रलंबित वारसा प्रकरणे, प्रलंबित पेन्शनर सेवकाची देणी, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता, सफाई कामगारांच्या निवासस्थानासाठी जागा, कालबद्ध पदोन्नती लाभ यासह विविध मागण्या कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे मांडल्या. यावेळी आयुक्तांनी वारसदारांच्या प्रलंबित प्रकरणी नियोजनबद्ध नियुक्ती देण्यात येईल. पेन्शनर सेवकाची
प्रलंबित देयके देण्याची माहिती संकलित करून नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याबरोबर कामगार संघटनाच्या प्रलंबित मागण्या लवकरच निकाली काढण्यात येईल असे सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्यलेखापरीक्षक रुपाली कोळी, मुख्यलेखा अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर, नगर रचना विभागाचे उपसंचालक मनिष भिष्णूरकर, मुख्य सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार, सहाय्यक अभियंता शकील शेख, कामगार क्रांती युनियनचे अध्यक्ष अशोक जानराव, अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेचे अध्यक्ष बाली मंडेपू, कामगार संघटना संघर्ष समितीचे अध्यक्ष सायमन गट्टू, कामगार संघटना संघर्ष समितीचे उपाध्यक्ष बापू सदाफुले, श्रीनिवास मंदोलू, चांगदेव सोनवणे, श्रीनिवास रामगल, पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष माऊली पवार, एम. आय. बागवान, मल्लिकार्जुन हुणजे, दिलावर मणियार आदी उपस्थित होते.
0 Comments