जड वाहतुकीसाठी रिंग रोड करा : आ. कोठे
विधिमंडळात वेधले लक्ष : शहरात धान्य वाटपात सावळा गोंधळ असल्याची टीका
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- जड वाहतुकीमुळे सोलापूर शहरात आठवड्याला अपघात होऊन अनेकांचे जीव जातआहे. शहरातील जड वाहतूक बंद करण्यासाठी रिंग रोड करावा, सोलापूर विमानतळास ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांचे नाव द्यावे, महाराष्ट्रटेक्निकल टेक्स्टाईल मिशनमध्ये सोलापूरचा प्राधान्याने समावेश करावा, शासनाच्या पर्यटन धोरणामध्ये धार्मिक पर्यटनाच्या अनुषंगानेजिल्ह्याचा समावेश व्हावा, जिल्ह्याला उमेद भवन मिळावे, अशा मागण्या आमदार देवेंद्र कोठे यांनी मंगळवारी (दि. ११) रात्री उशिरा विधानसभेत केल्या.
सोलापूर शहर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळे यातीनही राज्यातील जड वाहतूक सोलापूर शहरातून जाते. परिणामी जड वाहतुकीमुळे दर आठवड्याला दोन
जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून जड वाहतूक शहराबाहेरून नेण्यासाठी केगाव, कासेगाव, दोड्डी, कुंभारी, हत्तुर असा रिंग रोड होणे गरजेचे आहे. सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डमध्ये या रस्त्यांचा समावेश झाला आहे. परंतु या कामाची अद्याप सुरुवात झाली नाही.
त्यामुळे याचा प्राधान्याने विचार करावा.
वस्त्रोद्योग आणि आयटी क्षेत्रासाठी सोलापूरमध्ये चांगली क्षमता आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अधिकाधिक कंपन्या सोलापुरात याव्यात, यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात
उद्योगासाठी पोषक वातावरण, रेल्वेमार्ग, महामार्ग, कुशल कामगार वर्ग आहे. शासनातर्फे स्थापन होऊ घातलेल्या टेक्निकल टेक्स्टाईल मिशनमध्ये सोलापूरचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केली. सोलापूर विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी, याकरिता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे. त्यामुळे अल्पावधीतच सोलापूरची विमानसेवा सुरू होईल. या विमानतळाला ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली.
चौकट:-
अन्नधान्य वितरणात सावळा गोंधळ
अन्नसुरक्षा योजनेंतर्गत निकषात बसणाऱ्या सर्वांना स्वस्त धान्य दुकानातून
धान्य मिळणे अपेक्षित असतानाही सोलापुरातील एक लाख नागरिकांना धान्य
मिळत नाही. त्यामुळे शासनाने समतोलपणे धान्य वितरण करावे. अन्नधान्य
वितरणातील सावळा गोंधळ बंद करण्याची मागणी केली..
0 Comments