Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर नगरपरिषदेचे २६६ कोटींचे अंदाजपत्रक सादर

 पंढरपूर नगरपरिषदेचे २६६ कोटींचे अंदाजपत्रक सादर



कोणतीही करवाढ नसलेले शिलकी अंदाजपत्रक

पंढरपूर(कटुसत्य वृत्त):-
पंढरपूर नगरपरिषदेचे २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे २६६ कोटी रुपयांच्या कोणतीही करवाढ नसलेल्या शिलकी अंदाजपत्रकास प्रशासक तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी मंजुरी दिली.
डिसेंबर २०२१ साली पंढरपूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपली होती. त्यानंतर २०२२ सालापासून सलग चौथ्या वर्षी प्रशासनाने वार्षिक अंदाजपत्रक सादर केले आहे. मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी सदर अंदाजपत्रक सादर केले.
सादर करण्यात आलेल्या वार्षिक अंदाजपत्रकानुसार २६६ कोटी ४ लाख ६ हजार रुपये जमा तर २६५ कोटी ९७ लाख ५९ हजार रुपये खर्च असे ६ लाख ४६ हजार २१७ रूपये शिल्लक दाखविण्यात आली आहे.
सदर अंदाजपत्रकामध्ये १५ वित्त आयोग, वैशिष्ट्यपूर्ण योजना, विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान राज्यस्तर, नगरोत्थान जिल्हा स्तर, रमाई आवास योजना,प्रधानमंत्री आवास योजना, अग्निशमन सुरक्षा अभियान, यमाई तलाव सुशोभिकरण, प्राथमिक सोयी सुविधा विकास, मूलभूत सोयी सुविधा, स्वच्छ भारत अभियान, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी सुधार योजना, पाणीपुरवठा विषयक कामे, रस्ते दुरुस्ती, रस्ते बांधणी, नवीन गटारी यांची तरतूद करण्यात आलेली आहे. यावेळी लेखापाल करुणा शेळके, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, रोखपाल गणेश धारूरकर उपस्थित होते. अंदाजपत्रकातील तरतुदी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी सुधार योजना ५ कोटी नगरोत्थान राज्यस्तर रस्ते विकास ३० कोटी नगरोत्थान राज्यस्तर पाणी पुरवठा २९ कोटी ७६ लाख नगरोत्थान राज्यस्तर भुयारी गटार योजना ३० कोटी नगरोत्थान जिल्हास्तर ५ कोटी दलितेतर वस्ती सुधारणा योजना २ कोटी प्रधानमंत्री आवास योजना ३ कोटी रमाई आवास योजना ३ कोटी माझी वसुंधरा अभियान ३ कोटीरोडलाईट, पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्र, मलसिद्धीकरण केंद्र - वीज बिल १० कोटी ४१ लाख स्मशानभूमी सुधारणा २५ लाख गटार व नाले २५ लाख काँक्रीट रस्ते १ कोटी डांबरी रस्ते १ कोटी महिला बालकल्याण विकास २२ लाख दिव्यांग निधी २२ लाख

Reactions

Post a Comment

0 Comments