भीमाकाठच्या चार गावांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश
अत्यावश्यक सेवेसाठी केवळ तीन तास मिळणार वीज
सोलापूर(कटुसत्य वृत्त):-
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या टाकळी, औज, चिंचपूर, कुरपोट या गावांचा कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महावितरणला दिले असून अत्यावश्यक सेवेसाठी केवळ तीन तास बीजपुरवठा सुरू राहणार आहे.
भीमा नदीवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी औज य चिंचपूर कोल्हापूर पध्दतीच्या धान्यांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा जास्तीत जास्त दिवस पुरण्यासाठी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने वीजपुरवठा खंडित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्यानुसार भीमा नदी काठावरील औज व चिंचपूर या दोन को.प. धान्यांवरील नदीच्या डाव्या तीरावरील औज, चिंचपूर, टाकळी, कुरघोट या गावांचा कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत.
सोलापूर शहराच्या भीमा नदीवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी भीमा नदीवरील ओज व चिंचपूर बंधारे पूर्ण क्षमतेने भरत घेण्यात आले होते. २ मार्चपर्यंत औज यामध्ये २०५.६९ दलघफू व चिंचपूर बंधान्यामध्ये २०८. दलघफू असा एकूण ४१३.६९ दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु ९ मार्च रोजी औज बंधान्यामध्ये १७०-२५ दलघफू व चिंचपूर यामध्ये १३३.५५ दलघफू असा एकूण ३०३.९० दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. सात दिवसांत दोन्ही यातील १०९.७९ दलघफू पाणीसाठा कमी झाला आहे. दोन्ही धान्यातून शेतीसाठी होत असलेला पाण्याचा वापर नियंत्रित करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.
0 Comments