लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये मिळाले पाहिजेत ठाकरे सेनेची महिला आघाडी आक्रमक
सोलापूर(कटुसत्य वृत्त):- महायुतीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपयांचे अनुदान तातडीने द्यावे, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उध्दव वाळासाहेव ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घोपणावाजी करत यावावतचे निवेदन सादर केले.
शिवसेना जिंदावाद, निवडणुकीत केवळ मतदानापुरती गॅरंटी, सत्तेवर आल्यानंतर मात्र कोलांटी असली कुटनीती वंद करा नाहीतर खुर्ची खाली करा, लाडक्या वहिणींना दरमहा २१०० रुपये मिळालेच पाहिजेत, आशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी महिलांच्या प्रश्नांवर, लाडकी वहीण योजनेच्या अनुदानातील अडचणींवर महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी महिला आघाडीच्या शशिकला चिवडशेट्टी, प्रीती नायर, स्वाती रूपनर, ज्योती माळवदकर, गीता मदन, श्रीदेवी वगले, मीनाक्षी गवळी, मीना सुरवसे, जोहरा रंगरेज, सुनीता लोंढे, सुनंदा शिरूर, नागमणी भंडारी, दीपाली पवार, आशा कदम आदींसह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments