Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात अंमली पदार्थ ,विक्री तसेच सेवनावावत आळा घालण्यासाठी कारवाई जनजागृतीवरही भर द्यावा

 जिल्ह्यात अंमली पदार्थ ,विक्री तसेच सेवनावावत आळा घालण्यासाठी कारवाई जनजागृतीवरही भर द्यावा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात अंमली पदार्थ वाहतूक,विक्री तसेच सेवनावावत आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीच्या माध्यमातून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करुन कारवाई व त्यासोवतच जनजागृतीवरही भर द्यावा, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले.मंगळवारी, अंमली पदार्थ तस्करी व वापरावर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीची पोलीस अधीक्षक कार्यलय येथे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस अधीक्षक सीमा शुल्क विभाग महेंद्र प्रताप, जिल्हा अधीक्षक कृपी अधिकारी अभिजित धेटे,उपसंचालक औद्योगिक सुरक्षा सचालनालय ओम भांडेकरी,सहायक आयुक्त समाजकल्याण अंमली पदार्थ विरोधात जनजागृतीही आवश्यक एस.एम.शिंदे, महाराष्ट्र प्रदूपण नियंत्रण मंडळाचे किरण चव्हाण,पोलीस आयुक्तालयातील क्षीरसागर, अन्न व औषध प्रशासन विभागातील द. रा. विरगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मिलिंद कारंजकर, राज्य उत्पादन शुल्कचे जगन्नाथ पाटील, केंद्रिय गुप्तवार्ता वासुदेव अपसिंगेकर, नायव तहसीलदार वालाजी वनसोडे,सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आदी उपस्थित होते.कुलकर्णी म्हणाले, जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री व सेवनास आळा घालण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात यावा. अंमली पदार्थांची वाहतूक रोखणे यासाठी संयुक्त कारवाई होणे अपेक्षित आहे.याबाबत गुप्त माहिती घेऊन प्रतिबंध करणे ही उपाययोजना करीत असताना समाजात जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनाधिनते विरोधात प्रबोधन करावे. खासगी डॉक्टरर्स मानसपोचार तज्ज्ञ यांच्या मदतीने जनजागृती करून अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या रुग्णांना समुपदेशन करावे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यांनी केमिकल कारखाने तसेच बंद पडलेले कारखाने यांना भेटी देऊन तपासणी करावी. जिल्ह्यातील शहरी-ग्रामीण भागातील सर्व औषध विक्रेते दुकानाची वेळोवेळी अन्न औपध प्रशासानाने तपासणी करावी.शाळा महाविद्यालये, विद्यापीठ आदी ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी यांच्या मदतीने समाजात अंमली पदार्थांविरोधी जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच अंमली पदार्थांच्या विक्री व वाहतुकीसंबंधी माहिती मिळाल्यास पोलीस विभागाने विकसित केलेल्या क्यूआर कोड वर माहिती द्यावी संबंधितांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments