Hot Posts

6/recent/ticker-posts

न्यायालयीन लढ्यानंतर अखेर बाजार समितीची निवडणूक लागलीच...

 न्यायालयीन लढ्यानंतर अखेर बाजार समितीची निवडणूक लागलीच...




सोलापूर (कटुसत्य वृत्त):- सोलापर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी न्यायालयीन लढा उभा राहिला होता. त्यामुळे न्यायालयानेच येत्या चार आठवड्यात आहेत त्या टप्प्यावरुन निवडणूक कार्यक्रम पुढे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी निवडणूकीचा कार्यक्रम पाठविला होता. याबाबत न्यायालयीन लढ्यानंतर अखेर बाजार समितीची निवडणूक लागली. २५ मार्चपासून निवडणूकीचा कार्यक्रम सुरु होणार आहे. २७ एप्रिलला मतदान तर २८ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदाचा गोंधळ सुरु असतानाच पंधरा दिवसांपूर्वीच प्रशासक पदावरून मोहन निंबाळकर यांना पायउतार करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा मोहन निंबाळकर यांनी गुरुवारी प्रशासक पदाचा घेतला होता. कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वीच बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सहकार निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड हे हा निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे
प्रसिध्द करणार आहेत. त्यानंतरच निवडणूक प्रक्रियेला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे.
बाजार समितीची निवडणूक लागली होती. तेव्हा अर्ज विक्री आणि स्वीकृतीचा एक दिवस पूर्ण झाला होता. त्याचदिवशी निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे आता उरलेले चार दिवस म्हणजेच २५ ते २८ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीचा कार्यक्रम देण्यात आला आहे. १ एप्रिल २०२५ रोजी अर्ज छाननी होणार आहे. २ ते १६ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. १७ एप्रिल रोजी उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दरम्यान, मतमोजणीचे स्थळ आणि वेळ निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक किरण गायकवाड हे निश्चित करणार आहेत...

Reactions

Post a Comment

0 Comments