मोहोळ येथे अंनिसचा जिल्हा प्रेरणा मेळावा
अंनिसच्या जिल्हाध्यक्षपदी नंदकुमार फाटे; कार्याध्यक्षपदी धर्मराज चवरे
मोहोळ : (कटुसत्य वृत्त):- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा सोलापूरचा जिल्हा प्रेरणा मेळावा मोहोळ येथे झाला. यावेळी अंनिसच्या जिल्हाध्यक्षपदी मोहोळ येथील नंदकुमार फाटे, कार्याध्यक्षपदी धर्मराज चवरे तर प्रधान सचिवपदी अनिल माने यांची निवड करण्यात आली.
द्विवार्षिक निवड व प्रेरणा मेळाव्यासाठी सोलापूर शहर, मोहोळ, करमाळा, टेंभुर्णी शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. मध्यवर्तीकडून राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे व व्यवस्थापक अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे अजय भालकर उपस्थित होते. संजय बनसोडे म्हणाले की, विवेकी समाज निर्मितीसाठी विचारांची बांधिलकी पत्करलेल्या महाराष्ट्रातील विस्ताराने वर्धिष्णू असणाऱ्या एकमेव अंनिस संघटनेमार्फत आपली समाजसेवा कौतुकास्पद आहे. नव्या पिढीमध्ये डोळसपणा निर्माण करण्यासाठी आणखी खूप प्रयत्न करावेत, असे विचार त्यांनी व्यक्त केले. राज्य सरचिटणीस सुधाकर काशीद, बुवाबाजी संघर्ष विभाग राज्य कार्यवाह ॲड. गोविंद पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष धर्मराज चवरे, अनिल माने, दिगंबर साळुंखे, संजय हांडे, रामचंद्र बोधे गुरुजी, ज्योती पांढरे, अभिजित मोटे, शुभम साठे, मोहन कादे, हृषीकेश वाघ उपस्थित होते. सूत्रसंचालन धर्मराज चवरे तर आभार राजेंद्र मोटे यांनी मानले.
चौकट 1
पुढीलप्रमाणे निवडलेली कार्यकारिणी
नंदकुमार फाटे (अध्यक्ष), धर्मराज चवरे (कार्याध्यक्ष), अनिल माने (प्रधान सचिव), दिगंबर साळुंखे (वैज्ञानिक जाणिवा), अश्विन दळवी (युवा सहभाग), ज्योतीताई पांढरे (महिला सहभाग), विठ्ठल वठारे (विवेक जागर प्रकाश व अंधश्रध्दा निर्मूलन पत्रिका कार्यवाह), नवनाथ साळी (विविध उपक्रम विभाग कार्यवाह), संजय कांबळे (कायदे विषयक व्यवस्थापन विभाग कार्यवाह), नागेश माने (सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह), राजेंद्र साने (प्रशिक्षण व्यवस्थापक), विठ्ठल धोंडीबा यादव (बुवाबाजी संघर्ष कार्यवाह), सूर्यकांत वडजे (विज्ञान बोधवाहिनी विभाग कार्यवाह) आदींची निवड करण्यात आली.
0 Comments