Hot Posts

6/recent/ticker-posts

थकबाकी वसुली : २५ हजार मिळकतदार,

 थकबाकी वसुली : २५ हजार मिळकतदार,




गाळेधारकांची प्रकरणे लोक अदालतीत
२२ मार्च रोजी महापालिकेत आयोजन; शास्तीमध्ये मिळणार ५० टक्के सूट
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- मिळकत कर आणि मालमत्ता तसेच गाळेधारकांकडील थकबाकी वसुलीसाठी शहरातील २५ हजार जणांची प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीत ठेवण्यात आली असून, दि. २२ मार्च रोजी महापालिकेत होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत ही प्रकरणे पैसे भरून घेऊन निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
या लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडून सुमारे २४ हजार आणि भूमी व मालमत्ता विभागाकडील ९७८ थकबाकीदार असलेल्या मिळकतदारांची व गाळेधारकांची प्रकरणे तडजोडीसाठी दाखल करण्यात आलेली आहेत. सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्यामार्फत संबंधित मिळकतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. लोक अदालतीत मिळकतदारांच्या थकबाकीतील नोटीस फी, वॉरंट फी व शास्तीची जी रक्कम आहे. त्यामधील ५० टक्के रक्कम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची 'ड' प्रकरण ८ कराधान नियमातील नियम ५१ नुसार सुट म्हणून देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मिळकतदारांनी या सवलतीचा लाभ लोकअदालतीच्या माध्यमातून घ्यावा, जे मिळकतदार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत बजावण्यात आलेल्या नोटीसीस अनुसरुन थकबाकी भरणार नाहीत, त्यांच्याबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्या मिळकतदारांना नोटीसा प्राप्त झाल्या नाहीत असे मिळकतदार ५० टक्के शास्ती माफिचा लाभ घेऊ इच्छित आहेत अशा मिळकतदारांनीही दि. २२ मार्च रोजी लोक अदालतमध्ये देण्यात येणाऱ्या सवलतीचा लाभ संबंधित पेठेचे कर निरिक्षक यांना संपर्क साधून अथवा थेट ऑनलाई रक्कम भरुन घेऊ शकतात. दि. १ एप्रिल नंतर थकबाकीपोटी बोजा चढविलेल्या मिळकतींचा अधिनियमातील तरतुदीनुसार जाहिर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments