Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबवा

राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबवा


आ. बाबासाहेब देशमुख यांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी
सांगोला (कटुसत्य वृत्त):- महाराष्ट्रातील अर्ध्याहून अधिक जनता ही सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबात राहते. वैद्यकीय कारणासाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च अशा कुटुंबांना परवडत नाही. म्हणून गोरगरीब जनतेला महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून दर्जेदार आणि मोफत रुग्णसेवा देण्यात यावी तसेच या योजनेचा जास्तीत जास्त रुग्णांना लाभ व्हावा म्हणून सरकारने राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबवावी, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना राज्यात सक्षमपणे व सुरळीत सुरू राहून रुग्णांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून गुरुवार, दि. २० मार्च रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला आ. समाधान आवताडे, आ. सुनील प्रभू, आ. भास्कर जाधव, आ. कालिदास कोळंबकर आदी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत बोलताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, राज्यात जे धर्मादाय होणारी लूट थांबवावी आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना राज्यात सक्षमपणे व सुरळीत सुरू रुग्णालय सुरू आहेत अशा सेवाभावी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी तसेच खासगी रुग्णालयात रुग्णांची राहून रुग्णांना याचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे, असेही यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नमूद केले.
मागणीची तात्काळ दखल
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत. जनतेच्या या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. म्हणून राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना मोफत आणि दर्जेदार सेवा मिळावी, अशी मागणी या बैठकीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने याची दखल घेत प्रशासकीय यंत्रणेला सूचना देत धर्मादाय हॉस्पिटल तसेच खासगी हॉस्पिटल येथे गोरगरीब रुग्णांना वेळेवर उपचारांसाठी
मदत करण्याचे आदेश दिले


Reactions

Post a Comment

0 Comments