Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वामी समर्थांच्या मंदिरापासून तीनशे मीटर अंतरावर बियर शॉपी

 स्वामी समर्थांच्या मंदिरापासून तीनशे मीटर अंतरावर बियर शॉपी




अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा : आ. कल्याणशेट्टी यांची विधानसभेत मागणी
अक्कलकोट (कटुसत्य वृत्त ):- अक्कलकोट तालुक्याचे आराध्य दैवत वटवृक्ष श्री स्वामी समर्थांच्या मंदिरापासून तीनशे मीटर अंतरावरील बेकायदेशीर बियर शॉपी परवाना रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे.
अक्कलकोट शहरामध्ये सदरील शॉपी असून देखील दोड्याळ ग्रामपंचायतीचे बोगस कागदपत्र जोडून चुकीचे व बनावट कागदपत्राच्या आधारे बियर शॉपी परवाना देण्यात आलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्यासारखे कडक शिस्तीचे वरिष्ठ नेते त्या पदावर असताना देखील अधिकाऱ्यांनी त्यांना चुकीची माहिती देऊन बनावट कागदपत्राद्वारे बिअर शॉपीचा परवाना देण्यात आलेला आहे.
स्वामी समर्थांच्या मंदिरापासून ३०० मीटर अंतरावर चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेल्या बियर शॉपीचा परवाना रद्द करण्याबाबत चार वेळा संबंधित अधिकाऱ्यांना मी फोन करून सुद्धा परवाना रद्द केलेला नाही. दोड्याळच्या ग्रामसेविकेने चुकीच्या आणि बोगस कागदपत्राद्वारे परवाना दिल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना लेखी स्वरुपात कळवून देखील आणि बियर शॉपी परिसरातील शंभर महिला उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यासाठी गेले असता फक्त तीनच महिला आत या बाकीचे बाहेर थांबा, असे एका महिला अधिकाऱ्यांनी महिलांना अशा पद्धतीची वर्तणूक देणे अत्यंत चुकीचे आहे. त्या अधिकाऱ्यांनी निवेदन देणाऱ्या महिलांना आमच्याकडून चुकीचा परवाना देण्यात आला असल्याचे कबूली दिली मात्र त्यांनी परवाना देण्याचा अधिकार मला आहे रद्द करण्याचा अधिकार नसल्याचे सांगून महिलांना पाठवून दिले.
या महिला अधिकारी कोणाच्या दबावाला बळी पडू काम करीत आहेत का ? विधानसभेत एखादा सदस्य एका विषयावर लक्षवेधी मांडत असेल तर त्याच्या विषयाला सत्यता समजून निर्णय घेतला जातो ही सभागृहाची परंपरा आहे आणि दोषींवर कारवाई देखील होते. तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीवरून एका क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या तपासणीवर विश्वास ठेवून अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नये या बोगस परवाना देण्यामध्ये जे कोणी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई मंत्री करतील का, असा प्रश्न आमदार सचिन कल्याणशेट्टी मांडल्यानंतर ना. अजित पवार यांनी सदरील विषय राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस आयुक्त अधिकाऱ्याला तपासणीसाठी आदेश देण्यात येईल, दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन याप्रसंगी दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments