Hot Posts

6/recent/ticker-posts

भीमा कारखाना 'मल्टीस्टेट' संदर्भात कायदेशीर लढाई लढणार

 भीमा कारखाना 'मल्टीस्टेट' संदर्भात कायदेशीर लढाई लढणार



मोहोळ / (कटुसत्य वृत्त ):- शेतकऱ्यांचा राजवाडा असलेल्या भीमा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या ३० महिन्यापासून पगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून थकीत पगार, फायनल पेमेंट या समस्या असतानाच आता भीमा सहकारी साखर कारखाना 'मल्टीस्टेट' झाल्याच्या पार्श्वभूमीवर अड. महादेव चौधरी यांच्या सहकार्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायदेशीर लढाई लढणार असल्याचे प्रतिपादन युवा उद्योजक समाधान पांडुरंग शेळके यांनी केले.
भीमा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील पापरी (ता. मोहोळ) येथे नुकतीच भीमा कारखाना संदर्भात सभासद व कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी समाधान शेळके बोलत होते. यावेळी अॅड. महादेव चौधरी, पै.योगेश बोंबाळे, कामगार संघटनेचे हनुमंत चव्हाण, शेजबाभूळगावचे आण्णा पाटील, फुलचिंचोलीचे दिलीप पाटील, ब्रम्हपुरीचे दिलीप पाटील, टाकळी सिकंदरचे प्रकाश सोनटक्के आदींसह सभासद, कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना समाधान शेळके म्हणाले की, मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदरच्या माळरानावर असलेला भीमा सहकारी साखर कारखाना तत्कालीन चेअरमन स्व. सुधाकरपंत परिचारक व व्हॉईस चेअरमन स्व. पांडुरंग शेळके यांच्या अथक परिश्रमाने फायद्यात येऊन मोहोळ तालुक्यासह पंढरपूर
व मंगळवेढा तालुक्यातील भीमा कार्यक्षेत्रातील गावांचे नंदनवन झाले होते. या माध्यमातून अनेक कर्मचारी शेतकरी मजुरांचे संसार उभे करण्याचे पुण्यकाम झाले होते. तर पापरी (ता. मोहोळ) येथे सभासद व कर्मचारी बैठकीत बोलताना समाधान शेळके, कर्मचाऱ्यांच्या वेळेवर पगारी, सभासदांचे यावेळी अॅड. महादेव चौधरी, योगेश बोंबाळे आदी. ऊस बिल वेळेवर देऊन फायद्यात असणारा साखर कारखाना अडचणीत आणण्याचे काम महाडिक परिवाराने केले. तरीही घरचा कारखाना या नात्याने कर्मचारी गेल्या तीस महिन्यापासून पगारी नसतानाही राबत होते आणि ऊस बिल वेळेवर मिळत नसतानाही शेतकरी ऊस देत होते. मात्र कारखाना मल्टीस्टेट करून सभासद व कर्मचारी झोपेत असताना दगड घालण्याचे पाप कारखाना प्रशासनाने केले आहे. मात्र भीमा कारखान्याचे सलग २५ वर्ष संचालक असलेल्या माझे वडील स्व. पांडुरंग शेळके यांच्या व सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून उभा राहिलेल्या भीमा कारखान्याला मल्टीस्टेट करण्यापासून वाचवण्याचे काम करणे हे कर्तव्य समजून उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रसिद्ध वकील अॅड. महादेव चौधरी यांच्या सहकार्याने सहकारी संस्था टिकली पाहिजे, शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कायदेशीर लढाई लढणार असल्याचा पुनरुच्चार यावेळी समाधान शेळके यांनी केला.
उद्योजक समाधान शेळके यांचे प्रतिपादन
   
Reactions

Post a Comment

0 Comments