सार्वजनिक वाचनालयात हास्यरंग कार्यक्रम संपन्न
कारी, (कटुसत्य वृत्त):-
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा बार्शी यांचे वतीने होळी रंगपंचमी चे निमित्याने सार्वजनिक
वाचनालयाचे सभागृहात हास्य रंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय आझाद कामगार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व साहित्यिक प्राचार्य चंद्रहान्स
गंभीर हे होते.
प्रा. अशोक सावळे व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जुगल बापू तिवाडी हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा बार्शीचे अध्यक्ष पां. न. निपाणीकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामधून दर वर्षी घेतल्या जाणाऱ्या साहित्यिक कार्याचा आढावा सादर केला
व हास्य रंग कार्यक्रमचा उद्देश स्पष्ट केला. या कार्यकमामुळे सर्वांना मनसोक्त हसण्याचा आनंद मिळावा, दैनंदिन कामाच्या व्यापामधून थोडेसे मोकळे चाकले व्हावे,
तणाव मुक्त व्हावे, एकत्रित येऊन वेगळेपणा अनुभवावा. प्रा. गंभीर यांची ओळख शाख- चे कोषाध्यक्ष श्री. बी. आर. देशमुख यांनी करून दिली. या हास्यरंग कार्यक्रम मध्ये अनेक मान्यवारांनी विनोदी कविता, विनोद सांगून सर्वांना खळखळून हसविले या मध्ये कवयित्री शुभांगी काळे, कवी आर. डी. लिंबकर, प्रकाश गव्हाणे, कवी सचिन उकिरडे तसेच लेखक आबासाहेब घावटे, प्रकाश महामुनी, प्रदीप कांदे, स्वप्नील तुपे, सुनील फल्ले, सुभाष पाटील, हेमंत मस्के प्रा. अशोक सावळे, जुगल बापू तिवाडी, शब्द पल्लवीकार, दिलीप कल्याणी प्रा. बी. आर. देशमुख यांनी सहभाग घेतला.. अध्यक्षीय भाषांनामधून प्राचार्य गंभीर यांनी खलाळून सोडणारे विनोदी किस्से | सांगितले. सर्वांचे कौतुक केले तसेच जीवनामधील विनोदाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण विभुते यांनी तर आभार दिलीप कल्याणी यांनी
मानले.
हा कार्यक्रम यशवी करण्यासाठी गिरीष सोनार, प्रा. कल्याण घळके, प्रा. डॉ. रविराज फुरडे, सिद्धेश्वर धुमाळ, प्रकाश महामुनी, प्रकाश गव्हाणे, आबासाहेब घावटे, किरण विभुते व शाखा अध्यक्ष निपाणीकर यांनी परिश्रम घेतले.
0 Comments