रंगपंचमी निमित्त बार्शी साहित्य परिषदच्यावतीने हास्यरंग कार्यक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 21, 2025

रंगपंचमी निमित्त बार्शी साहित्य परिषदच्यावतीने हास्यरंग कार्यक्रम

 रंगपंचमी निमित्त बार्शी साहित्य परिषदच्यावतीने हास्यरंग कार्यक्रम

बार्शी (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा बार्शी यांचे वतीने रंगपंचमी निमित्ताने सार्वजनिक वाचनालयाचे सभागृहात हास्यरंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय आझाद कामगार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व साहित्यिक प्राचार्य चंद्रहान्स गंभीर हे होते. माजी नगरसेवक अशोक सावळे व जुगल तिवाडी हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे बार्शी अध्यक्ष पां. न. निपाणीकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामधून दर वर्षी घेतल्या जाणाऱ्या साहित्यिक कार्याचा आढावा सादर केला व हास्य रंग कार्यक्रमचा उद्देश स्पष्ट केला. या कार्यकमामुळे सर्वांना मनसोक्त हसण्याचा आनंद मिळावा, दैनंदिन कामाच्या व्यापामधून थोडेसे मोकळे ढाकळे व्हावे, तणाव मुक्त व्हावे, एकत्रित येऊन वेगळेपणा अनुभवाव असे सांगितले.
गंभीर सर यांची ओळख शाखेचे कोषाध्यक्ष बी. आर. देशमुख यांनी करून दिली.या हास्यरंग कार्यक्रम मध्ये अनेक मान्यवारांनी विनोदी कविता, विनोद सांगून सर्वांना खळखळून हसविले. या मध्ये कवयित्री शुभांगी काळे, कवी आर. डी. लिंबकर, प्रकाश गव्हाणे कवी सचिन उकिरडे तसेच लेखक आबासाहेब घावटे, प्रकाश महामुनी, प्रदीप कांदे, स्वप्नील तुपे, सुनील फल्ले, सुभाष पाटील, हेमंत मस्के, शब्द पल्लवीकार यांनी सहभाग घेतला.. अध्यक्षीय भाषांणामधून प्राचार्य गंभीर यांनी खळळून सोडणारे विनोदी किस्से सांगितले. सर्वांचे कौतुक केले तसेच जीवनामधील विनोदाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे संञसंचलन कवी किरण विभुते यांनी तर आभार दिलीप कल्याणी यांनी मानले.कार्यक्रम यशवी करण्यासाठी गिरीष सोनार, कल्याण घळके, प्रा. डॉ. रविराज फुरडे, सिद्धेश्वर धुमाळ, प्रकाश महामुनी, प्रकाश गव्हाणे, किरण विभुते यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages