Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामांना माहिती तंत्रज्ञानाची जोड..! -विभागीय आयुक्त पुलकूंडवार

 सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामांना माहिती तंत्रज्ञानाची जोड..! 

-विभागीय आयुक्त पुलकूंडवार

सिईओ जंगम यांचे कामांचे कौतुक 


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामांना माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. मालमत्ता नोंदी, मनुष्यबळ व्यवस्थापन, शंभर दिवस अभियान या कामांनी माहिती तंत्रज्ञानाची जोड देणेत आलेली पाहून विभागीय

आयुक्त चंद्रकांत पुलकूंडवार यांनी कौतुकाची थाप टाकत सिईओ कुलदीप जंगम यांचे कामांचे कौतुक केले. 

सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या पुणेचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकूंडवार यांनी आज सोलापूर जिल्हा परिषेदेस भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.  सोलापूर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करणेत आले. या प्रसंगी  उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव , शिक्षणाधिकारी  कादर शेख , कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी , जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी , जिल्हा कृषी अधिकारी हरिदास हावळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित आहेत. प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी पंढरपूर तिर्थक्षेत्रा चे कामावर आधारित काॅफी टेबल बुक विभागीय आयुक्त पुंडकुलवार यांना भेट देऊन स्वागत केले.



सिईंओ कुलदीप जंगम यांनी लाईव्ह संकेतस्थळावर जिल्हा परिषदेच्या मालमत्ता नोंदी , गुगल वरील स्थळांचे चित्रण , जिल्हा परिषदेच्या मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणाली ची माहिती दिली. समाज कल्याण विभाग अंतर्गत ८५०० अपंगानी विविध सुविधा सह घरपोच दिलेल्या सुविधांची माहिती दिली. जिल्हा समाज कल्याण विभागाने केलेल्या युआयडी कामाचे कौतुक केले. 

सोलापूर जिल्हा परिषेदेचा चेहरा मोहरा बदलतोय..! - विभागीय आयुक्त पुलकूंडवार

………………

सोलापूर जिल्हा परिषदेने शंभर दिवस अभियानातील कामांना माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. त्याच बरोबर अद्यावत सभागृहांचे नूतनीकरण , अभ्यागत व कर्मचारी यांचे भोजन व्यवस्थेसाठी च्या सुविधा, अभ्यागतांना पिण्याच्या

पाण्याची सुविधा, गार्डन आवार व हिरकणी कक्षाची फिरून पाहणी करून सिईओ कुलदीप जंगम यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. सर्व माहिती संकेतस्थळावर एका छताखाली आणली आहे. असेही विभागीय आयुक्त पुलकूंडवार यांनी सांगितले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे संकल्पनेतील शंभर दिवस अभियानाची निगडीत विविध उपक्रमाचे पाहणी  विभागीय आयुक्त पुलकूंडवार यांनी केली. केंद्र शासनाची सुसंवाद स्वच्छता तक्रार निवारण कार्यालयीन सोयी सुविधा कामकाजातील सुविधा अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण सेवा विषयक बाबी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान याचा वापर आर्थिक गुंतवणुकीस प्रोत्साहन नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्ये शिखर जीवनमान कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा याबाबतची माहिती घेऊन त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामाचे कौतुक केले.

या प्रसंगी जिल्हा परिषदे युनियन च्या वतीने चेअरमन डाॅ. शत्रुघ्नसिंह माने यांनी आयुक्त पुलकूंडवार यांचे स्वागत केले तर मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद च्या वतीने अविनाश गोडसे यांनी विभागीय आयुक्त पुलकूंडवार यांना छावा कादंबरी देऊन स्वागत केले.

Reactions

Post a Comment

0 Comments