Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवाजी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा

 शिवाजी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा



बार्शी (कटुसत्य वृत्त):-
येथील श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये 'सायन्स फॉर जस्टीस' या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगरचे तज्ज्ञ प्रा. डॉ. चैतन्य चव्हाण आणि डॉ. चैतन्य भासखेत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. डॉ. चैतन्य चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना फॉरेन्सिक सायन्समधील विविध शाखा आणि त्यामधील करियर संधीबाबत मार्गदर्शन केले. गुन्हाचा तपास लवकरात लवकर होण्यासाठी देशांमध्ये फॉरेन्सिक सायन्समधील तज्ज्ञ लोकांची संख्या वाढवण्याची गरज आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. डॉ. चैतन्य बासखेत्रे यांनी 'सायबर क्राईम' या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यातून कसे वाचवावे? आणि विद्यार्थ्याकडून कोणताही सायबर गुन्हा होणार नाही याची दक्षता कशी घ्यावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये वरिष्ठ विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. शशिकांत गायकवाड यांनी केले. डॉ प्रतिभा ढाले व शीतल ठोंगे तसेच डॉ. प्रदीप काटे यांचा सन्मान केला. सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब सोनवणे आणि डॉ. राजश्री गव्हाणे यांनी केले. डॉ. व्ही. एम.
गुरमे यांनी आभार मानले. प्रा. दत्तात्रय जमाले, प्रा. संजय पाटील, प्रा. रोहिणी जंगले, डॉ. उमेश बरचे आदींनी परिश्रम घेतले. 
Reactions

Post a Comment

0 Comments