Hot Posts

6/recent/ticker-posts

जिजाऊ रथयात्रा स्वागतासाठी कुर्डुवाडीकर सज्ज

जिजाऊ रथयात्रा स्वागतासाठी कुर्डुवा डीकर सज्ज



कुर्डुवाडी (कटुसत्य वृत्त):- मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडो अभियान राबवण्यात येत असून, या निमित्ताने जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून ही रथयात्रा काढण्यात आली आहे. कुर्डुवाडीत ही रथयात्रा सोमवार या रथयात्रेच्या नियोजनासाठी गेले काही दिवस कुर्डुवाडी शहर व परिसरातील ग्रामीण भागातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन केले जात आहे. माढा तालुक्यातून असंख्य शिवप्रेमी नागरिक या रथयात्रेच्या स्वागतासाठी व सभेसाठी उपस्थित राहणार आहेत...
'पंजाब सिंध, गुजरात, मराठा महाराष्ट्रात राहतो तो मराठा' याप्रमाणे अठरापगड जातीतील मराठा बहुजन समाजबांधवांना एकत्रित करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोड़ो अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी १८ मार्च रोजी शहाजी महाराजांच्या जन्मदिनी वेरुळ येथील भोसले गढी येथून जिजाऊ रथयात्रेचा प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रदिनी १ मे रोजी लाल महाल पुणे येथे या रथयात्रेची सांगता होणार आहे.
२४ मार्च सोमवार रोजी या रथयात्रेचे आगमन पंढरपूरहून अकलूज टेंभुर्णीमार्गे कुर्डुवाडी येथे होईल. कुर्डुवाडीतील गावदेवी मंदिरा पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जिजाऊ रथयात्रचे चौकाचौकात स्वागत होईल. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ मार्च रोजी मंगळवारी रथयात्रा कुर्डुवाडीहून माढा, मोहोळमार्गे सोलापुराकडे रवाना होईल. स्वागत सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष नीलेश
देशमुख यांनी केले आहे.
यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक संजय टोणपे, तात्यासाहेब पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, सुहास टोणपे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा निताताई खटके, प्रफुल्लता मोहिते, मनीषा गाडे, अविनाश पाटील, शिवाजी गवळी, अरुण जगताप, सचिन महिंगडे आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments