Hot Posts

6/recent/ticker-posts

निंबाळकरांच्या पदभारास स्थगिती

 निंबाळकरांच्या पदभारास स्थगिती


डॉ. बगले यांची याचिका : बाजार समितीबाबत न्यायालयाचा निर्णय
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदावर दुसऱ्यांदा मोहन निंबाळकर यांची नियुक्ती झाली होती. त्या विरोधात डॉ. बसवराज बगले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने प्रशासक पदभार घेण्यास स्थगिती दिली आहे.
डॉ. बगले यांनी दाखल केलेल्या तातडीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदाचा पदभार तत्काळ सोडावे,
असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. पुणे येथे पणन विभागाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या निंबाळकर यांच्या नियुक्तीला डॉ. बगले यांनी हरकत घेऊन त्यांनी केलेल्या नियमबाह्य कामकाजाबद्दल पणनमंत्री आणि प्रधान सचिवाकडे पुराव्यांसह तक्रारी केल्या होत्या. त्यावर पणन संचालकांचा खुलासा सरकारने मागविला होता.
जिल्हा उपनिबंधकांच्या परस्पर पत्रव्यवहार करून बेकायदेशीर कामकाजाचा सपाटा लावल्याने त्यांच्याविषयी जिल्हा उपनिबंधकांनी गंभीर आरोपांचा अहवाल सादर केल्याची माहिती डॉ. बसरवाज बगले यांनी यावेळी सांगितले.

चौकट 1
पणनमंत्र्यांकडून घेतली होती नियुक्ती
पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी पाच मार्च रोजी प्रशासक निंबाळकर यांना
कार्यमुक्त केले होते. तसेच शहर उपनिबंधक प्रगती बागल यांची प्रशासक पदावर नियुक्ती
केली होती. मात्र निंबाळकर यांनी पणनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन दुसऱ्यांदा
प्रशासक म्हणून नियुक्ती घेतली होती.

Reactions

Post a Comment

0 Comments