आदिती तटकरेंचा वाढदिनी ईच्छा भगवंताची परिवाराकडून सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 18, 2025

आदिती तटकरेंचा वाढदिनी ईच्छा भगवंताची परिवाराकडून सत्कार

 आदिती तटकरेंचा वाढदिनी ईच्छा भगवंताची परिवाराकडून सत्कार





सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आदिती तटकरे यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथील गीताबाग या निवासस्थानी नामदार आदितीताई तटकरे यांची भेट घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतील पिंक कॅम्पेन अंतर्गत त्यांना पिंक शाल, अक्कलकोट निवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा तसेच भला मोठा हार घालून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी माजी आमदार अनिकेत भाई सुनील तटकरे यांचा देखील यावेळी किसन जाधव यांनी मखमली टोपी,शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. दरम्यान यावेळी किसन जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका विभागातील लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळावा यासाठी योजना यशस्वी राबविणाऱ्या आशा वर्कर्स यांचा मानधन काही दिवसापासून थकीत आहे ते मानधन लवकरात लवकर मिळावी अशी विनंती नामदार आदितीताई तटकरे यांच्याकडे केली तत्काळ यावर आपण आशा वर्कर्स यांचा प्रलंबित मानधनाचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही यावेळी महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी किसन जाधव यांना दिली. या सत्कार सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, सरचिटणीस संतोष गायकवाड हुडको, महादेव राठोड, दीपक आरगेल, आनंद गाडेकर यांच्यासह ईच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात राबवा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे वर्चस्व राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशा सूचना देखील यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी किसन जाधव यांना दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages