धनजंय पाटील यांच्या नविन ट्रक्टरची पूजा गौतमी पाटील हिच्या हस्ते संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 25, 2025

धनजंय पाटील यांच्या नविन ट्रक्टरची पूजा गौतमी पाटील हिच्या हस्ते संपन्न

धनजंय पाटील यांच्या नविन ट्रक्टरची पूजा गौतमी पाटील हिच्या हस्ते संपन्न 
 


कटूसत्य (माढा) पडसाळी ता-माढा येथे युवा शेतकरी धनंजय पाटील यांनी नवीन घेतलेल्या ट्रक्टरची पूजा सिने अभिनेञी सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली.त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या कि शेतीच्या मशागतीसाठी आजही विविध टप्प्यावर यंञाचा वापर केला जात असला तरी तो मर्यादित आहे. सर्वच क्षेञात स्पर्धा खूप वाढली आहे. तरुणांनी पारंपारीक शेती न करता एक व्यवसाय ,उद्योग म्हणून शेतीकडे पाहावे.त्यादृष्टीने शेतीमध्ये यांञिक पध्दतीचा वापर करुन अधिकाधिक उत्पन्न कसे घेता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.आपले इच्छित ध्येय साध्य करायचे असेल तर संघर्ष हा करावाच लागतो.मी सुध्दा खूप संघर्ष करुनच इथंपर्यत पोहोचले. सरपंच योगेश पाटील यांनी गौतमी पाटील यांचा सत्कार केला. यावेळी ट्रॅक्टर मालक धनंजय पाटील. सरपंच योगेश पाटील सचिन पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष महेश पाटील शिवाजी पाटील भरत पाटील प्रविण पाटील  अनुरथ पाटील गणेश मुटकुळे,विलास देशमुख ,दत्तात्रय देशमुख, आण्णा टेलर, अजिंक्य पाटील, शरद पाटील , ओंकार पाटील, विलास बापू पाटील, शंभू मुटकुळे,पैलवान अथर्व पाटील शिवाजी पाटील शेतकरी बांधव उपस्थित  होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages