Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या निवडणुका लढवणार; सतीश सपकाळ

 माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या निवडणुका लढवणार; सतीश सपकाळ 




पै.संकते वाघमोडे व पै.रोहित नेटवे याचा शिवसेनेकडून सत्कार

नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथे सतिश सपकाळ यांचे अध्यक्षतेखाली शिवसेना (शिंदे गट) माळशिरस तालुका आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शक सुचेने नुसार माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे,तसेच इच्छुकांची यादी मुंबईतील बाळासाहेब भवन कडे पाठविण्यात येणार आसल्याचे सतिश सपकाळ यांनी सांगुन तालुक्यात शिवसेना पक्ष वाढ विस्तारासाठी गाव तिथे शिवसेना शाखा उभारून निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या अधिक जागा यावेत, यासाठी लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आसल्याचे मत शिवसेना (शिंदे गट) माळशिरस तालुका प्रमुख सतिश सपकाळ यांनी व्यक्त करून बैठकीत शिवसेना पक्ष प्रवेश व वाढ विस्तार, शाखाप्रमुखांची नियुक्ती करणे, जिल्हा परिषद व पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी लढविणे, इच्छुक उमेदवारांची यादी तयार करणे,यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
  या बैठकीसाठी माळशिरस तालुक्यातील नुतन पदाधिकारी महादेव तुपसौंदर,तानाजी भोसले, सुनील साठे,जेष्ठ शिवसैनिक रावसाहेब,कोकाटे, संतोष गोरे,हनुमंत कर्चे, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष भिमराव भुसणर, रणजित गायकवाड,नातेपुते शहर प्रमुख पै.निखिल पलंगे,अनिल दडस,माळशिरस शहर प्रमुख महादेव जगताप, सोमनाथ दणाणे, सहप्रमुख शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
   दरम्यान अकलूज येथे आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणीत माळशिरस येथील पै.संकेत वाघमोडे याची ११० किलो वजन गट राज्यातून निवड तर पै.रोहित नेटवे रा.नातेपुते याची ८१ किलो वजन गट जिल्हातुन आहिल्यानगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल
शिवसेना (शिंदे गट) माळशिरस तालुका प्रमुख सतिश सपकाळ यांच्या शुभ हस्ते पैलवान नेटवे, वाघमोडे याचा सत्कार करण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments