कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 24, 2025

कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द

 कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द

१ एप्रिलपासून अंमलबजावणी; राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा



मुंबई (कटुसत्य वृत्त):- केंद्र सरकारने देशभरातील कांदा उत्पादकांना दिलासा देत कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे. या निर्णयामुळे कांद्याची निर्या करता येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील कांदापटट्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण मंत्रालयाने यावावतची अधिसूचना प्रसिध्द केली आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत कांद्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि कांद्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी कांद्यावर निर्यात शुल्क आणि किमान निर्यात मूल्य लागू केले होते, त्यानंतर ८ डिसेंवर २०२३ ते ३ मे २०२४ या पाच महिन्यांत निर्यात वंदी लागू केली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांद्यावरील निर्यात बंदी आणि किमान निर्यात मूल्याचे निर्बंध उठवण्यात आले होते. पण, १३ सप्टेंबरपासून २० टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आले होते. निर्यात वंदी किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कामुळे कांद्याच्या निर्यातीवर विपरीत परिणाम झाला होता.
वर्ष २०२३ - २४ मध्ये एकूण १७.१७ लाख टन कांद्याची निर्यात झाली होती, तर आर्थिक वर्ष २०२४- २५ मध्ये १८ मार्चअखेर ११.६५ लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे.
योग्यवेळी केंद्राचा निर्णय
राज्यासह देशभरात रब्बी हंगामातील कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काढणी सुरू असल्यामुळे वाजारात कांद्याची आवक वाढली आहे. देशभरातील वाजारात कांद्याची आवक वाढल्यामुळे दर पंधराशे सोळाशे रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी
शेतकऱ्यांकडून होत होती.
रब्बी हंगामातील कांद्यात पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे या कांद्याच्या निर्यातीला प्राधान्य दिले जाते. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे निर्यात वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
या निर्णयावावत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. यावद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आभारी आहे.


उत्पादनात १८ टक्क्यांनी वाढ
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या रब्बी हंगामात देशभरात २२७ लाख टन कांदा उत्पादन होण्याची शक्यता आहे.. गतवर्षी १९२ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी कांदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages