महापालिकेतील लोकअदालतीत १०.१२ कोटींचा मिळकतकर वसूल
एकूण २९६२ मिळकतदारांनी लावली हजेरी
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- महापालिकेत शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मिळकत करासंदर्भात दोन हजार ८४० मिळकतदारांनी हजेरी लावली. एकूण १० कोटी १२ लाख ७३ हजार १४९ रुपये मिळकतकर वसूल झाला आहे. एकूण १ कोटी ८० लाख २९ हजार ६१३ रुपये सूट मिळवली आहे. १२२ गाळेधारकांनी ९ लाख ९ हजार ७०९ रुपये जमा केले आहेत.
आयुक्त डॉ. सचिन ओम्यासे यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत दिली. घेण्यात आली. मिळकतकर शनिवारी संकलन विभागाचे अधीक्षक लोकअदालतीमध्ये युवराज गाडेकर यांच्यासह कर विभागांतर्गत निरीक्षक व कर्मचान्यांनी हा उपक्रम यशस्वी केला.
या लोकअदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडून सुमारे २४ हजार तर भूमी मालमत्ता विभागाकडील थकबाकीदार असलेल्या मिळकतदार तसेच गाळेधारकांची प्रकरणे तडजोडीसाठी दाखल झाली होती. दाखल प्रकरणनिहाय सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्यामार्फत संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. लोकअदालतमध्ये मतदारांच्या थकबाकीतील नोटीस फी वॉरंट फी व शास्तीच्या रकमेत ५० टक्के सवलत देण्यात आली, अशी माहिती उपायुक्त लोकरे यांनी
शनिवारी झालेल्या लोकअदालतमध्ये मिळकतकर विभागांतर्गत २७६५ मिळकतदारांनी हजेरी लावली. त्यांनी ६ कोटी ८१ लाख २७ हजार ५३६ रुपये थकबाकी भरली. यामध्ये धनादेशापोटी ७५ जणांनी एक कोटी ५१ लाख १६ हजार रुपये जमा केले तर मिळकत
करावायत धनादेश सोडून एकूण १ कोटी ८० लाख २९ हजार ६१३ रुपये सूट मिळवली आहे.
एकूण २८४० मिळकतदारांकडून १० कोटी १२ लाख ७३ हजार १४९ रुपये कर वसूल केला आहे. मिळकतकर विभागांतर्गत १० ते २२ मार्च दरम्यान एकूण ६ हजार ३५४ मिळकतदारांकडून १७ कोटी ४७ लाख ९७ हजार ५५८ रुपये कर जमा झाला आहे.
महापालिकेच्या भूमी मालमत्ता विभागांतर्गत शनिवारी लोकअदालतमध्ये ११२ गाळेधारकांकडून ९ लाख ९ हजार ७०९ रुपये वसूल झाले आहेत. या अंतर्गत आतापर्यंत एकूण १ कोटी २२ लाख ६८ हजार ५५४ रुपये वसूल झाले आहेत.
दरम्यान, ज्या मिळकतदारांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत बजावण्यात आलेल्या नोटिसीस अनुसरन थकबाकी भरणार नाहीत त्यांच्याबाबत न्यायालयाच्या निर्दे शानुसार व अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई सुरु होईल.
चौकट १
बोजा चढवलेल्या मिळकतींचा १ एप्रिलनंतर जाहीर लिलाव थकबाकी असलेल्या मिळकतीवर बोजा चढविलेल्या मिळकतीचा अधिनियमातील तरतुदीनुसार १ एप्रिलनंतर जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. याची सर्व थकबाकीदार मिळकतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले.
0 Comments