सोलापूरला न्यायाधीशांची गौरवशाली परंपरा : ओक
सोलापूर /(कटुसत्य वृत्त):- जिल्ह्याने न्यायव्यवस्थेला अनेक नांगले न्यायापोश दिले असून सोलापूरला न्यायाधीशांची गौरवशाली परंपरा आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.
रविवारी, हुतात्मा स्मृती मंदिरात सोलापूर वार असोसिएशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वकिलांच्या परिषदेत न्यायमूर्ती ओक हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, याचे कौटुंबिक न्यायापी अमित आळंगे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व सदस्य अॅड. मिलिंद थोबडे, सर्वोच्च न्यायालयातील अॅड. डॉ. अरविंद आव्हाड, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
घटनेच्या उद्देशिकेला वंदन व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या परिषदेचे उदघाटन करण्यात आले आहे.
आपल्या उद्घाटनपर भाषणात न्यायमूर्ती ओक म्हणाले, न्यायमूर्ती उदय लळीत, भीमराव नाईक, अजित शहा, एम. एस. जामदार, नितीन जामदार, ओकांत साठे आदी न्यायाधीश सोलापूरचे आहेत. न्यायमूर्ती नाईक व शहा यांच्याकडून आपण वकिलीचे पडे घेतले आहेत. यापुढेही सोलापूरच्या न्यायाधीशांनी परंपरा सुरुच राहील.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शर्मा म्हणाले, सोलापूर बार असोसिएशनकडून चांगले काम सुरू आहे. न्यायालयाच्या कोणत्याही उपक्रमाला वार अध्यक्ष व पदाधिकारी चांगला प्रतिसाद देतात. त्यांचे चांगले सहकार्य मिळते. सनी अपडेट असायला पाहिजे. ज्ञानार्जनाची प्रक्रिया सतत चालू असावी. बार असोसिएशन जेवढा स्ट्रॉग असेल तेवढे जजमेंट चांगले होतात. वकिलांच्या चर्चासत्रामुळे नवीन पिढीला एक चांगल्या प्रकारची दिशा व मार्गदर्शन मिळेल.
यावेळी महाराष्ट्र व गोवा यार कौन्सिलचे सदस्य अॅड. पोवडे म्हणाले, सोलापूर चार असोसिएशनचे पदाधिकारी दिल्ली अभ्यास दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांनी न्यायमूर्ती ओक यांची भेट घेऊन सोलापूरला होणाऱ्या वकील परिषदेच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूपवावे, अशी विनंती केली होती. स्वानुसार त्यांनी आठवणीने सोलापूरला ई-मेल करून २३ मार्चला आपण येणार असल्याचे कळविले. त्यांनी अनेक लँडमार्क जजमेंट दिले आहेत. मध्यंतरी कर्नाटकात वानरांचा अकाली मृत्यू झाला. त्यावेळी त्यांनी सुमोटो पिटीशन दाखल करून घेऊन गाइडलाइन्स दिल्या. अंगणवाडी सेविकांना ग्रेच्युटी मिळण्याचा हक्क आहे याबाबत त्यांनी जजमेंट दिले.
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ विजय मराठे यांनी न्यायमूर्ती ओक यांचा परिचय करून देताना त्यांच्या वेगवेगळ्या जजमेंटची माहिती दिली. कार्यक्रमास न्यायापीश शहर व जिल्हा बरोबर राज्यभरातून मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. प्रास्ताविक बार असोसिएशनने अध्यक्ष अॅड. शिंदे यांनी तर स्वागत अँड निदा सैफन यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बार असोसिएशनचे सचिव अॅड. मनोज पामूल व अंड. श्रेया सापटणेकर यांनी केले. तर आभार खजिनदार विनयकुमार कटारे यांनी मानले.
चौकट 1
बार असोसिएशनच्या वेबसाइटचे उद्घाटन सोलापूर बार असोसिएशनच्या वेबसाइटचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते संगणकाची कळ दाबून करण्यात आले. यावेळी सोलापूर बार असोसिएशनने वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती एलईडी
प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादर करण्यात आली.
0 Comments