अक्कलकोट आगारात नव्या दहा बसेस दाखल
अक्कलकोट : (कटुसत्य वृत्त ):- अक्कलकोट एस.टी. आगारात प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या १० एस.टी. बसेस दाखल झाल्या असून, त्यांचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. अक्कलकोट येथे राज्यभरातून आणि बाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी विविध सेवा-सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आ. कल्याणशेट्टी पुढे म्हणाले, अक्कलकोट येथे एस. टी. सेवा अधिक सक्षम व सोयीस्कर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात आणखी नवीन बसेस आणि सुधारित सुविधा देण्याचा निर्धार आहे. अक्कलकोट आगारात एस.टी. महामंडळाच्या नव्याने १० बसेस आज दाखल झाल्या. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसेस मोठ्या संख्येने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील एस.टी. सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने सातत्याने पावले उचलत आहोत.
याप्रसंगी विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील, विभागीय यंत्र अभियंता शीतल बिराजदार, विभागीय स्थापत्य अभियंता तुषार चौधरी, विभागीय अधिकारी मालन बनसोडे, आगार व्यवस्थापक रणजित साळवे, वाहतूक निरीक्षक नागेश रोडगे, वाहतूक निरीक्षक पवन हनगल, प्रभारक संजय कांबळे, भाजप शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, माजी ता. अध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, परमेश्वर यादवाड, शिवसेना
तालकाप्रमुख संजय देशमुख, रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे आदी उपस्थित होते.
0 Comments