अरण येथील सबस्टेशनचा आ. पाटील यांच्या हस्ते शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 24, 2025

अरण येथील सबस्टेशनचा आ. पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

अरण येथील सबस्टेशनचा आ. पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
मोडनिंब / (कटुसत्य वृत्त ):- अनेक वर्षांपासून माढा मतदार संघातील प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांना रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने आमदार अभिजित पाटील हे प्रयत्न करताना दिसत आहेत. अनेक वर्षांपासून अरण येथील शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याकडे गांभीर्याने लक्ष घालून आमदार अभिजित पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून अरण येथील ५ के. व्ही. सबस्टेशनची क्षमता दुप्पट केली असून, या सब स्टेशनचे उद्घाटन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी आमदार पाटील यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या सब स्टेशनची क्षमता दुप्पट झाल्याने अरण गावासह तुळशी, जाधववाडी, बैरागवाडी या गावांतील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा होणार असल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी माजी जि.प. सदस्य भारत शिंदे, चंद्रकांत गिड्डे, एकनाथ सुर्वे, हरिदास रणदिवे, शरद मोरे, नारायण माळी, प्रमोद कुटे, बालाजी पाटील, यशवंत शिंदे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages