Hot Posts

6/recent/ticker-posts

जात धर्म द्वेष नको तरुणाईला रोजगार द्या - युवा महासंघाची मागणी

 जात धर्म द्वेष नको तरुणाईला रोजगार द्या - युवा महासंघाची मागणी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी CMIE ही भारतातील महत्त्वाची आर्थिक माहिती पुरवणारी संस्था आहे. ती आर्थिक धोरणे ठरवण्यासाठी, गुंतवणूकदारांना माहिती पुरवण्यासाठी आणि संशोधकांना आकडेवारीसाठी उपयुक्त ठरते. या संस्थेने नुकतेच भारताची बेरोजगारी दर: सुमारे 7-8% जाहीर केले. भारतामध्ये बेरोजगारी ही एक मोठी सामाजिक आणि आर्थिक समस्या आहे. यावर उपाय म्हणून शासन विविध योजनांवर काम करत आहे, परंतु अधिक रोजगारनिर्मिती आणि व्यावसायिक शिक्षणावर भर देताना दिसत नाही.  शिक्षण घेतलेल्या आणि काम करण्यासाठी सक्षम असलेल्या व्यक्तींना त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार मिळत नसल्यास ती अवस्था बेरोजगारी म्हणून ओळखली जाते. भारतासारख्या विकसनशील देशात बेरोजगारी ही एक जटिल समस्या बनली असून सत्ताधारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने तरुणाईत मोठा असंतोष वाढलेला आहे.याचे दुष्परिणाम केंद्र आणि राज्य सरकार ला भोगावे लागतील असा इशारा युवा महासंघाचे जिल्हा सचिव ॲड अनिल वासम यांनी एकता मशाल रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

शहीद भगतसिंग, सुखदेव , राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनी सोलापूर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (डी. वाय.एफ.आय.) जिल्हा समिती च्यावतीने 23 मार्च 2025 रोजी जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून त्यांच्या नेतृत्वाखाली एकता मशाल रॅली काढून शहीदांना अभिवादन  करण्यात आले.  
ही मशाल रॅली संध्याकाळी 6 वाजता भैया चौक येथील साहित्यरत्न कॉ.अण्णाभाऊ साठे व आंतरराष्ट्रीय मानवतावादी डॉ द्वारकानाथ कोटणीस यांना अभिवादन करून सुरुवात होईल आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पार्क चौक येथील सोलापूरचे चार हुतात्मा व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून येथे अभिवादन करून समारोप करण्यात आला.

मशाल रॅलीच्या समारोप प्रसंगी युवा महासंघाचे राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण यांनी तरुणाईला संबोधित करताना म्हणाले की, "जात, धर्म, द्वेषाला देऊ मूठमाती,एकतेची मशाल घेऊन हाती!"  या राजकारणाला आपण सर्व शक्ती पणाला लावून विरोध केला पाहिजे. भारत देश हा सर्वांचा देश आहे. इथल्या प्रत्येक नागरिकांचा देश आहे. मग तो नागरिक कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो वा समाजाचा असो. हे तत्व आपण प्राणपणाने जपूया धर्मांधांच्या धोक्याविषयी जनतेत जागृती करण्याचा एकजूट करण्याचा  आपण सदैव प्रयत्न करूया.शहीद भगतसिंग, सुखदेव राजगुरू या क्रांतिकारकांनी पाहिलेल्या उज्ज्वल भारताचे स्वप्न साकारण्यासाठी या महान क्रांतिकारकांना शिरसावंद्य मानणाऱ्या तरुणाई समोर आज हे तगडे आव्हान उभे ठाकले आहे.

युवा महासंघाचे माजी अध्यक्ष अशोक बल्ला यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी बाळकृष्ण मल्याळ,विजय हरसूरे, खादर शेख, अश्विनी मामड्याल, मधुकर चिल्लाळ, दिनेश बडगु, अमित मंचके,श्रीकांत कांबळे, विल्यम ससाणे,बापू साबळे, मुरलीधर सुंचू, श्रीनिवास म्हेत्रे,दीपक निकंबे,सनी शेट्टी, मोहन जंगम, किशोर झेंडेकर, राहुल बुगले,सनी आमाटी, पुष्पा गुरूपनवर , अभिजीत निकंबे, गोविंद सज्जन, आप्पाशा चांगले,मल्लेशाम कारमपुरी, अतुल फसाले, नरेश गुल्लापल्ली,योगेश आकीम,चंद्रकांत मंजुळकर अरुण सामल आदींनी विशेष परिश्रम घेतले.
`
Reactions

Post a Comment

0 Comments