Hot Posts

6/recent/ticker-posts

स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने वसतिगृहातील मुलांसोबत रंगपंचमी साजरी

 स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने वसतिगृहातील मुलांसोबत रंगपंचमी साजरी





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष किरण माशाळकर यांनी सोलापूरात वसतिगृहातील मुलांसोबत रंगपंचमी साजरी करण्याची संकल्पना आणली.दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा श्री हिंगलाजमाता  मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह ,सोलापूर येथे मुलांसोबत रंगपंचमी साजरी करण्यात आली.
सदर वसतिगृहातील मुले सोलापूर जिल्हा व इतर जिल्ह्यातील आहेत. हे मुलं आपल्या कुटुंबा समवेत सण साजरा करत नाहीत .त्या मुळे दर वर्षी स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या वतीने रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात वसतिगृहात साजरा केला जातो.तेथील मुले खूप आनंदी होते.वसतिगृहातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्षा कु. किरण माशाळकर, लता ढेरे व संस्थे चे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
Reactions

Post a Comment

0 Comments