उदघाटनाला सहा महिने पूर्ण, तरीही विमानसेवा नाही! सोलापूरकरांची फसवणूक? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 21, 2025

उदघाटनाला सहा महिने पूर्ण, तरीही विमानसेवा नाही! सोलापूरकरांची फसवणूक?

उदघाटनाला सहा महिने पूर्ण, तरीही विमानसेवा नाही! सोलापूरकरांची फसवणूक?



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरच्या होटगी रोड विमानतळाचा उद्घाटन सोहळा २९ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून हा समारंभ संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या सोहळ्याला साक्षी होते. मात्र, निवडणूक आचारसंहितेपूर्वी हा कार्यक्रम उरकण्यात आल्याने प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होईल की नाही, याविषयीचं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

आज सहा महिने उलटले तरीही सोलापूरकरांना विमानसेवेचा लाभ मिळालेला नाही. केवळ उद्घाटनाचा दिखावा करून जनतेला गाजर दाखवण्यात आले आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. जर सर्वसामान्य प्रवाशांसाठी विमानसेवा सुरू होत नसेल, तर या विमानतळाला कुलूप का लावू नये? केवळ पुढारी आणि अधिकाऱ्यांसाठीच सुविधा का? असा रोखठोक सवाल शहरवासीयांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून अशा प्रकारची अपेक्षा नव्हती. सोलापूरच्या जनतेने आता या विषयावर ठोस उत्तर मागण्याची गरज आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages