निमाच्या वतीने देशव्यापी संवेदना 2.0 रक्तदान शिबिराचे आयोजन
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निमा आणि निफा यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिनी रविवार दि. 23 मार्च रोजी देशभरात संवेदना 2.0 या नावे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय प्रवर्तक डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशभरातील निमाच्या सर्व शाखांकडून रक्त संकलनाचे कार्य करण्यात येणार आहे. यापूर्वी नेमाने 99 हजार 644 इतके रक्त संकलन केले होते. निमा ही सर्वात मोठी वैद्यकीय संघटना असून चार लाखाहून अधिक डॉक्टर सदस्य आहेत. निमा सोलापूर शाखेकडून रविवार दि. 23 मार्च रोजी बाराहून अधिक ठिकाणी रक्त संकलन केंद्रे उपलब्ध करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील विविध हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात येत आहेत. सोलापूर परिसरातून एक हजाराहून अधिक बॉटल रक्त संकलन करण्याचा प्रयत्न आहे, असे निमा सोलापूर शाखा अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी , मुख्य समन्वयक डॉ. नितीन बलदवा यांनी सांगितले.
नागरिकांनी या शिबिरात रक्तदान करून राष्ट्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेचे डॉ. नितीन बलदवा, डॉ. रवी गायकवाड, डॉ. अभिजीत पुजारी, डॉ. प्रवीण ननवरे, डॉ. रमाकांत अयाचित आदी उपस्थित होते.
0 Comments