विविध मागण्यांसाठी सोलापूरात कंत्राटदारांचे धरणे आंदोलन यशस्वी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 12, 2025

विविध मागण्यांसाठी सोलापूरात कंत्राटदारांचे धरणे आंदोलन यशस्वी

 विविध मागण्यांसाठी सोलापूरात कंत्राटदारांचे धरणे आंदोलन यशस्वी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व विभागाकडील कंत्राटदार यांचे देयके गेल्या आठ महिन्यापासून दिली जात नाही.तसेच कंत्राटदार यांच्या महत्त्वाचे मागण्यांबाबत कायम दुर्लक्ष केले जात आहे या सर्व गंभीर गोष्टी चा निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापुरात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालय समोर पुनम गेट येथे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, राज्य अभियंता संघटना, सोलापुर जिल्हा लेबर फेडेरेशन , सोलापूर महापालिका contractors असोसिएशन द्वारे धरणे आंदोलन मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कंत्राटदार  संख्येने यशस्वीपणे पार पडले.  
                                                 सदर आंदोलनात विविध संघटनेच्या  सदस्य व पदाधिकारी यांच्या वतीने शासकीय फुकट वाटप धोरणांचा निषेध केला, तसेच राज्यातील विकासांची कामे केलेल्या कंत्राटदार जाणीवपूर्वक देयके न देणे व त्यांच्या इतर मागण्यांबाबत शासनाकडून  कायम दुर्लक्ष करणे, या बाबींचा समाचार सदर आंदोलनात घेण्यात आला. बजेट मध्ये आर्थिक  नियोजन शुन्य कारभार, तसेच सदर मार्च मध्ये कंत्राटदार यांची शासनाकडून देयके न मिळाल्यास सदर वित्तीय संस्था चे  कंत्राटदार वर भलेमोठे ओढावणारे आर्थिक संकट यामुळे कंत्राटदार व त्यांचे कुटुंब व त्यावर अवलंबून असणारे लाखो घटकांचे संसार उद्ध्वस्त होणार तर आहेतच तसेच कंत्राटदार यांचा आर्थिक दृष्ट्या  महत्त्वाचे घटक असलेला CIBIL हा घटक प्रचंड खालच्या स्तरावर येणार आहे, तसेच राज्याची पुढील काळात गंभीर होणारी आर्थिक परिस्थिती यामुळे सदर व्यवसाय अडचणीत येणार आहे. अशी भिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले यांनी व्यक्त केली आहे.
 सदर आदोलनास बहुसंख्येने उपस्थित असलेल्या कंत्राटदार मंडळींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता मा संजय माळीसो यांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले तसेच सोलापूर जिल्हा चे निवासी जिल्हाधिकारी मा मनीषा कुभांरमॅडम यांना भेटुन निवेदन दिले सदर आंदोलन मध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले , बिल्डर्स असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष संतोष कलगुटगी, माजी राज्य अध्यक्ष दत्तात्रेय मुळे, सोलापूर जिल्हा लेबर फेडेरेशन चे सचिव चंद्रकांत आवताडे,सोलापूर महापालिका contractors असोसिएशन चे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ, इलेट्रीक कंत्राटदार संघटनेचे उपाध्यक्ष बसवराज कल्याणी, कांतीलाल डुबल, सिद्देश्वर काळे, शिवानंद पाटील, त्रज्ञषी वानकर,कैलास लांडे, नरेंद्र भोसले, अभिराज शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हा अध्यक्ष सुहास कदम, सचिव बाळासाहेब मोरे, अजय अन्नलदास, हणमंत कुलकर्णी, युवराज चुंबळकर,महेश जाधव, विनोद क्षीरसागर, सोमनाथ दावणे,संतोष लांबगुडे, शरणप्पा शिरूर, गोविंद अनागुंडे, सादिक शेख, विशाल जोग, राजाभाऊ कलकेरी,सचिन गुंड,महादेव घोडके, शेखर शिवशरण, प्रमोद कुलाल, अमोल गौर, मनोहर शिराळ, सतीश जंगाले,राजेश सुरवसे, सचिन जाधव, मारूती पवार, युवराज मुटकुळे, विलास बेडगे,राजकुमार खुर्द, श्रीनिवास इंगवले, गणपत मस्के, दीपक मोहिते, केशव घोगरे, महेश माने, हेमंत पाटोले, बाळासाहेब मोटे, श्रीकर बरबडे,संजय डांगे, श्रीकर बरबडे, दिनेश झांबरे, सुधीर लांडे, सागर पवार, श्रीकांत बिराजदार, नित्यानंद शिंदे, बालाजी विठलकर,संजय देशपांडे, हणमंतु तरंगे, विलासराव पाटील, सुनील दुधगंडी, महेश बेदरे,अभिजीत पांगळे, प्रमोद भंडारे, उमेश सोनी, मनोज मेहता, मुकेश हजारीवाले,अक्षय हणमे,अंजिक्य उंबरजे,सिद्धाराम ढंगापुरे, दत्तात्रेय जाधव, आंनद वंजारे,सुजित पाटोळे, अमर चौगुले, विवेक भोसले, बाळासो मोरे, भारत कोरडे सह असंख्य सुशिक्षित बेरोजगार अभियंता, कंत्राटदार, मजुर संस्था सदर आंदोलनात बहुसंख्येने प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages