Hot Posts

6/recent/ticker-posts

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी ची विश्वचैतन्य आयुर्वेदिक कंपनीला भेट

 आर्या कॉलेज ऑफ फार्मसी ची विश्वचैतन्य आयुर्वेदिक कंपनीला भेट  



टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ टेंभूर्णी संचालित आर्या कॉलेज ऑफ फार्मसी टेंभूर्णी येथील औषधनिर्माण शास्त्र पदविका प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्षेत्रभेट दिली. बारामती येथील विश्वचैतन्य आयुर्वेदिक रसशाला येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना औषध निर्माण कंपनीतील सर्व विभागाची सविस्तर माहिती देण्यात आली जसे की प्रोडक्शन, कॉलिटी कंट्रोल, पॅकेजिंग आदी बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली. या भेटीदरम्यान औद्योगिक कंपनीमधील वेगवेगळ्या उत्पादनासाठी चालणाऱ्या कार्यप्रणाली अगदी जवळून निरीक्षण केल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपकरणाची तसेच कार्याची माहिती घेता आली.  यावेळी यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय चव्हाण यांनी कंपनीची सखोल माहिती दिल्याबद्दल व्यवस्थापकांचे आभार मानले. प्रा. हर्षवर्धन वाघमारे, विजय शिंदे, प्रा. संजीवनी कुटे आणि अमृता कसबे यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments