मराठा प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 12, 2025

मराठा प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...

 मराठा प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर शहर जिल्ह्यामधील मराठा समाजातील क्रिकेट खेळाडूंसाठी मराठा प्रीमियर लीग २०२५ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नेहरूनगर येथील शासकीय क्रीडांगणावर करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये सोलापूर शहरांमधील आठ संघ व सोलापूर ग्रामीण मधील आठ संघ असे सोळा संघाने सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा टेनिस बॉलवर खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण २५६ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. अशी माहिती आयोजक प्रशांत बाबर यांनी दिली आहे.

या स्पर्धेतील सर्व खेळाडूंना ड्रेस प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एक लाख रुपयांचे आहे. द्वितीय पारितोषिक ५१ हजार रुपयांचे शुभम भोसले यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. तृतीय पारितोषिक २५ हजार रुपयांचे विजय कोकाटे मोहोळ यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये मालिकावीर साठी १० हजार रुपयांचे पारितोषिक डॉक्टर सुमित मोरे यांच्या वतीने देण्यात आलेले आहे, तर उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक योगेश गवळी यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. या स्पर्धेतील सर्व ट्रॉफी विक्रांत पवार यांच्या वतीने देण्यात आलेल्या आहे. 

या स्पर्धेची सुरुवात २६ मार्च पासून सुरू होणार असून अंतिम सामना हा ३० मार्च रोजी खेळण्यात येणार आहे. ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळवण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला लीग मधील तीन सामने खेळावयास मिळणार आहेत. शहरातील आठ संघांचे खेळाडू ऑक्शन पद्धतीने निवडण्यात येणार आहेत. तरी शहरांमधील मराठा समाजातील ज्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी शंकर पवार ७०२०८३२०७९, अमोल जगताप ९९६००१२०८०, सागर गव्हाणे ९१३०७७३४५६, रोहित जाधव९०२१३९६५६४ यांच्याकडे नावे नोंदवावी असे आवाहन आयोजक प्रशांत बाबर यांनी केले आहे. यावेळी राम साठे, शंकर पवार, सागर गव्हाणे, प्रा. अश्विनकुमार नागणे, रोहित जाधव, सचिन खंडागळे आधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages