Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावून विकास कामांना चालना दिली- किसन जाधव

 प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावून विकास कामांना चालना दिली- किसन जाधव



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रभाग क्रमांक २२ मधील विविध विकास कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून सर्वाधिक निधी मंजूर करून घेऊन प्रभागातील नागरिकांना पायाभूत व अत्यावश्यक ठरणाऱ्या विकास कामांना प्राधान्याने प्रत्यक्षात गती देत मार्गी लावण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रभाग क्रमांक २२ येथील राजीव नगर ते आम्रपाली चौक रस्ता डांबरीकरण शुभारंभ प्रसंगी म्हणाले. दरम्यान सोलापूर महानगरपालिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत सन २०२३-२४ या हेड अंतर्गत २७ लाख १७ हजार ७१९ रुपये खर्चित राजीव नगर ते आम्रपाली चौक रस्ता डांबरीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, चंद्रकांत चलवादी, सुरेश भंडारे, मोतीलाल करबसू जाधव, पाटील वकील, रमेशचलवादी ,दिनेश चलवादी, बुवा लाकूड अड्डेवाले,भुजंग लामतुरे, यल्लाप्पा लामतुरे,लक्ष्मण कट्टी, शिवाय कलीम,शेख बबलू जगले, सय्यद तायप्पा बेरे, बजरंग भंडारे,जगन्नाथ सुरवसे, अनुसया शिंदे,पर्वती चोपडे, वनिता कोकरे, यशोदा पिसे, तानोबाई टकले, उषाताई कांबळे,राजश्री बोराटे, रहीबाई मस्के, मंगलाताई कोरे, सोनाली हेमगड्डी,भानुबाई पवार, नागुबाई लामतुरे आदींच्या उपस्थितीत या रस्ता डांबरीकरण कामाचे शुभारंभ विधिवत पूजनाने करण्यात आले. दरम्यान राजीव नगर ते आम्रपाली चौक या रस्ता डांबरीकरण कामामुळे आता येथील नागरिकांना वाहतुकीसाठी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांनी प्रभागातील विकास कामांना चालना दिली आता प्रभागातील कामे पूर्णत्वाकडे येत असल्याने आम्ही समाधानी असल्याची भावना येथील रहिवाशांनी यावेळी व्यक्त केली. प्रभाग २२ येथील रस्त्यांची दुरवस्था झाली होती यामुळे येथील नागरिकांना दळणवळणात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते त्यामुळे रस्त्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केले होते त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या आणि माझ्या प्रयत्नातून डांबरीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आला. त्यातीलच राजीव नगर ते आम्रपाली चौक हा प्रभागातील महत्त्वाचा रस्ता आहे या रस्त्याचे काम आता लवकरच पूर्ण होईल प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत या पुढील काळात देखील प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणार आहोत अशी ग्वाही देखील यावेळी किसन जाधव यांनी दिली. या रस्ता डांबरीकरण काम शुभारंभ प्रसंगी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments