कुमठे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये योग शिबिर आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आर्ट ऑफ लिव्हिग चे संस्थापक गुरुदेव प.पु.श्री श्री रविशंकर यांच्या वतीने कुमठे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तीन दिवसाचे मेधा शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते.
कुमठे कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे विश्वस्त जयकुमार माने व स्वातीताई माने यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योग प्रशिक्षक देव गोसकी व गोरख डांगे यांनी या शिबिराचे मार्गदर्शन केले. या शिबिरात त्यांनी विविध प्रकारची प्राणायाम व योगासने यांचा मानवी शरीरासाठी होणारा फायदा यांचे महत्त्व सांगितले तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता वाढवणे यासाठी योगाचे अत्यंत महत्त्व आहे तसेच मनातील व शरीरातील सकारात्मक बदल यासाठी योग व प्राणायाम हे अत्यंत महत्त्वाचे आहेत असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनी विद्यार्थ्याकडून विविध प्रकारचे योग व प्राणायाम करून घेतले.
हे योग शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा.संजय जाधव, प्रा. दादाराव डांगे, प्रा.हनुमंत शिंदे, प्रा. दीपक शिंदे, प्रा. विजयकुमार वाळके, प्रा. विनोद थोरात, प्रा.राजीव निकम व प्रा.बंडोपंत बाबर यांनी परिश्रम घेतले.
0 Comments