आरक्षण वर्गीकरणासाठीच्या हलगी मोर्चाची नियोजन बैठक संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मातंग,मांग,मोची,मादिगा समाजाचे राष्ट्रीय नेते पद्मश्री मंदा कृष्णा मादिगा यांच्या नेतृत्वाखाली दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी अनुसूचित जातीचे अ,ब,क,ड वर्गीकरणासाठी हलगी मोर्चा हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेला आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उप-वर्गीकरण करण्याची परवानगी राज्यांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या ऐतिहासिक निकालामुळे मिळाली असतानाही बरीच राज्य सरकारे चालढकल करत आहेत. या पार्श्वभूमीवर झोपलेल्या राज्य सरकारांना जागं करण्यासाठी या हलगी मोर्चाचे आयोजन केले आहे.
या मार्चांसाठी आंध्र, कर्नाटक,तामिळनाडू, तेलंगणातील हलगी वादक लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील मांग, मातंग,मोची,मादिगा समाजातील सुध्दा समाज बांधवांनी मोठया संख्येने हलगी मोर्चात सहभागी व्हावे यासाठी अवाहन करण्याकरीता MRPS नेते मा.सत्यम रागटी मादीगा सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. हा मोर्चा यशस्वी करण्याकरीताची नियोजन बैठक सत्यम रागटी मादीगा यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह,सात रस्ता, सोलापूर येथे संपन्न झाली. या बैठकीस मातंग, आदि जांबमुनी मोची समाजातील प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने नियोजन बैठकीला उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक सकल मातंग समाज राज्य समन्वयक, सुरेश पाटोळे यांनी केले. आदि जांबमुणी मोची समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे, माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी या बैठकीस मार्गदर्शन केले.MRPS नेते मा.सत्यम रागटी मादीगा यांनी हलगी मोर्चा मागील भूमिका स्पष्ट केली ; आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
या नियोजन बैठकीस सुधाकर पाटोळे, गोविंद कांबळे, नरसिंह आसादे, सिद्राम कामाठी नागनाथ कासलुलकर प्रवीण वाडे,रोहित खिलारे, मच्छिंद्र लोकेकर, डॉ, योगेश पल्लेलु, विश्वनाथन पाटोळे, आदी मातंग व मोची समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत,आभार नरसिंह आसादे यांनी व्यक्त केले.
0 Comments