Hot Posts

6/recent/ticker-posts

त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे गणेश जयंती निमित्त 171 जणांचे रक्तदान आणि महाप्रसादाचे आयोजन

 त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे गणेश जयंती निमित्त 171 जणांचे रक्तदान आणि महाप्रसादाचे आयोजन



बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश जयंती निमित्त त्रिमूर्ती प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये १७१ रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान केले. विशेष बाब म्हणजे सहा दांपत्यांनी जोडीने या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. यानंतर महाप्रसादाचे देखील आयोजन त्रिमूर्ती प्रतिष्ठान बार्शी च्या वतीने करण्यात आलं होते. या महाप्रसादाचा अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला.
दुपारी बारा वाजता श्रीगणेशाची आरती पत्रकार संजय बारबोले तसेच डॉ.सौ शीतल बोपलकर,मनीष चव्हाण पत्रकार धीरज शेळके, वृक्ष संवर्धन चे उमेश काळे, लहू चव्हाण, पत्रकार अक्षय बारंगुळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.य सर्व मान्यवरांच्या हस्ते आरती  करण्यात आली.
यावेळी वर्षभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून समाजात एक वेगळं स्थान निर्माण केलेल्या त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक डॉ. शितल बोपलकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष बबलू साळुंखे तसेच उपाध्यक्ष प्रवीण शिंदे आणि मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments