Hot Posts

6/recent/ticker-posts

पिंपरी दुमाला येथे हळदी कुंकूवाचा समारंभाचे आयोजन खळदकर दाम्पत्यांचा स्तुत्य उपक्रम

 पिंपरी दुमाला येथे हळदी कुंकूवाचा समारंभाचे आयोजन 

खळदकर दाम्पत्यांचा स्तुत्य उपक्रम

शिरूर  (कटूसत्य वृत्त):- नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो महिला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकूवाचा समारंभाचे आयोजन करतात पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो. हळदीकुंकू करणे म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे असं मानले जाते. यावेळी हळदीकुंकूवाचा सोहळा रथसप्तमी 4 फेब्रुवारीपर्यंत आहे 

        दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पिंपरी दुमाला येथील म उपसरपंच शरद नानाभाऊ खळदकर व कल्पना शरद खळदकर (शालेय शिक्षण समिती मा अध्यक्ष)यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक हळदीकुंकू कार्यक्रमातून विविध सामाजिक संदेश देत एक अनोख्या पद्धतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न केला हळदी कुंकू कार्यक्रम म्हटले की महिलांचा जिव्हाळ्याचा विषय येतो या कार्यक्रमा मध्ये सर्व उपस्थित महिलांना वान म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या गावातील सर्व महिलांना जेवणाचा सुंदर कार्यक्रम ठेवण्यात आला या कार्यक्रमाला रांजणगाव देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर यांनी उपस्थिती लावत सर्व महिलांना हळदी कुंकवाचे महत्त्व पटवून सांगत असताना योग्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला पिंपरी दुमाला  येथील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष शालेय शिक्षण समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य विविध सोसायटी सर्व संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार कार्याध्यक्ष सचिव आदी उपस्थित होते गावातील हा आगळावेगळा नाविन्यपूर्ण हळदी कुंकू कार्यक्रम असल्याने सदर कार्यक्रम गावात कौतुकाचा विषय ठरत आहे


Reactions

Post a Comment

0 Comments