Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन - उपमुख्यमंत्री अजित पवार

 कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीनउपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई(कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआयचा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेकृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृष्यप्रणालीद्वारे)सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरअखिल भारतीय द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष कैलास पाटीलनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे (व्यय) प्रधान सचिव सौरभ विजयकृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीकृषी आयुक्त सूरज मांढरेसाखर आयुक्त कुणाल खेमनारनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंगसहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटीलबारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. निलेश नलावडेप्रा. योगेश फाटकेप्रा. तुषार जाधवप्रा. शरद ताटे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेजगभरातील प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे क्रांतिकारी बदल घडत आहेत. कृषी क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. येत्या काळात बदलते हवामानअवेळी पडणारा पाऊसपीकांवर वारंवार होणारा रोगांचा प्रादुर्भावमजुरांचा तुटवडा यांवर मात करत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक आरोग्याचे विश्लेषणमातीतील कार्बन प्रमाण शोधणेमातीच्या आरोग्याची सविस्तर माहितीतणाचा प्रकार ओळखणेपूर्वीच्या उत्पन्नाची तुलनामातीचे तापमानवातावरणातील आर्द्रतापिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव ओळखणेतसेच पिकांवरील जैविक-अजैविक ताण ओळखणे शक्य होणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पीकांच्या उत्पादनात वाढमजुरी खर्चात बचतरसायनिक खते व औषधांच्या वापरात कपातकापणी कार्यक्षमतेत वाढरोगनियंत्रणाद्वारे बचतपुरवठा साखळीतील कार्यक्षमतेत वाढ आणि एकूण खर्चात कपात होणे शक्य होईल. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक आणि आमूलाग्र बदल घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments