Hot Posts

6/recent/ticker-posts

निवडणूक आयोगाला नोटीस

 निवडणूक आयोगाला नोटीस

मुबंई (कटूसत्य वृत्त):-  विधानसभेला सायंकाळी ६ नंतर झालेल्या मतदानावर दोन आठवड्यात उत्तर द्या, हायकोर्टाचे आदेश  विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहानंतर तब्बल ७५ लाख मतदान झाले. या वाढीव मतदानाबाबत केंद्र व राज्य निवडणूक आयोगाने आतापर्यंत खुलासा केलेला नाही. तपशील देण्यास दोन्ही आयोग अपयशी ठरल्यास निवडणूक रद्द करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर आणि चेतन अहिरे यांनी विधानसभा निवडणुकीत जवळपास ९५ मतदारसंघांमध्ये अनेक तफावती असल्याचे निदर्शनास आणून देत यासंदर्भात केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगांनी खुलासा करावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठाने केंद्रीय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांना नोटीस बजावत दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments