तुकाराम मुंढेंनंतर आता 'हा' अधिकारी सरकारच्या 'टार्गेट'वर. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 6, 2025

तुकाराम मुंढेंनंतर आता 'हा' अधिकारी सरकारच्या 'टार्गेट'वर.

 तुकाराम मुंढेंनंतर आता 'हा' अधिकारी सरकारच्या 'टार्गेट'वर.

मुंबई (कटूसत्य वृत्त):-राज्यात नवीन सरकार येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली होणं हे आता सामान्य झालं आहे. त्याप्रमाणेच आता महायुती  सरकार स्थापन होताच पुन्हा एकदा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण नुकतंच सरकारकडून 13 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये IAS राहुल कर्डिले यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण महिनाभरापूर्वीच सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झालेल्या कर्डिले यांच्याकडे आता पुन्हा नांदेडचे  जिल्हाधिकारी पदाचा कारभार देण्यात आला आहे.

राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगरचे असून 2015 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग परभणीमध्ये होती. ट्रेनी आयएएस म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आलं होतं. त्यानंतर अमरावतीमध्ये त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. नंतरच्या काळात त्यांची MMRDA च्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर नुकतंच महिनाभरापूर्वी त्यांची सिडकोच्या  सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे नांदेडच्या जिल्हाधिकारीपदाचा कारभार देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages