Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला दिमाखात प्रारंभ

 अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला दिमाखात प्रारंभ

अकलूज (कटूसत्यवृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 107व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन सौ.सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने झाले.

           या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,आ.दिलीप सोपल,समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील, अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील,सहकार महर्षी लावणी पुरस्कार विजेत्या वैशाली जाधव,रेश्मा परितेकर, प्रमिला लोदगेकर,बरखाताई जळगावकर,सुरेखाताई पवार प्रमुख उपस्थित होते.

       स्मृतिभवन शंकरनगर येथे दि.1 व 2 फेब्रु. या कालावधीत या स्पर्धांचे आयोजन केले आहे. प्रस्ताविकात कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, जयसिंह मोहिते पाटील यांनी सहकार महर्षींचे अमृत महोत्सवी जयंती वर्ष जानेवारी १९९३ पासून राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला सुरुवात केली.व हा लावणी स्पर्धेचा प्रवास अविरतपणे तब्बल 28 वर्ष चालला.जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील या बंधूंच्या अमृतमहोत्सवा निमीत्तानेही स्पर्धा आयोजित केली.   लावणीची महाराष्ट्राला मोठी संस्कृती,परंपरा व वरदान आहे.या वर्षी 10 पार्ट्यांना सहभाग दिला आहे. पुढील वर्षी पासून गट अ,व गट ब अशा दोन गटांत स्पर्धा होणार असून या मुळे कलाकारांना संधी व प्रोत्साहन मिळेल.

स्पर्धेच्या प्रारंभी सादरीकरणाचा पहिला मान पूनम नगरकर, लक्ष्मी लोकनाट्य संस्कृती कला केंद्र सणसवाडी ता. शिरूर, जि. पुणे या संघाला मिळाला. त्यांनी सादर केलेल्या,मराठमोळी कला ही नारी, तिच्यावर रुसू नका,लावणी विसरू नका. या लावणीला रसिकांनी दाद दिली. सायंकाळी उशिरापर्यंत अनिता परभणीकर नटरंग कला केंद्र मोडनिंब, अश्विनी, योगिता, परितेकर जय अंबिका कला केंद्र सणसवाडी, प्रीती परळीकर न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र केडगाव चौफूला व माया खामगावकर नटरंग कला केंद्र मोडनिंब या पार्टीचे सादरीकरण झाले.

या स्पर्धेसाठीची भव्य पारितोषिके --

प्रथम क्रमांकास रुपये तीन लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख, तृतीय क्रमांकास रुपये एक लाख, चौथ्या क्रमांकास 75हजार व पाचव्या क्रमांकास 51 हजार अशी बक्षिसे आहेत. तर उत्कृष्ट नृत्यांगना रुपये ५ हजार व कै. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील स्मृती चषक, उत्कृष्ट अदा (वैयक्तिक) रुपये ५ हजार, उत्कृष्ट मुजरा रुपये ३ हजार, या शिवाय उत्कृष्ट ढोलकीपटू, उत्कृष्ट पार्श्वगायिका, उत्कृष्ट पेटीवादक, व उत्कृष्ट तबलावादक यांनाही वैयक्तिक  पारितोषिक देण्यात येणार आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments