इलेक्ट्रो प्रदर्शन म्हणजे ग्राहकांसाठी मोठी पर्वणीच
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इलेक्ट्रो प्रदर्शन म्हणजे सोलापूरकरांसाठी मोठी पर्वणीच असून विविध कंपन्या एकाच छताखाली आल्याने त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सवलतीतील वस्तूंचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा. यातून ग्राहकांचा तर फायदा व्हावाच. परंतु, सोलापूर शहराचाही आर्थिक आलेख उंचावला जावा,अशी अपेक्षा महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी व्यक्त केली.वुधवारी, होम मैदान येथे सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन अर्थात सेडाद्वारा इलेक्ट्रॉनिक्स, १२ ते १८ फेब्रुवारीदरम्यान स्वामी, सेडाचे उपाध्यक्ष सूरजरतन धूत, सुयोग कालाणी, परीक्षित रॉय, भूषण भुतडा आदींची प्रमुख उपस्थिती होती.आयोजित कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टम,फिटनेस इक्विपमेंटसचे भव्य प्रदर्शन 'इलेक्ट्रो २०२५' चे उद्घाटन आयुक्त तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सेडाचे प्रेसिडेंट आनंद येमूल हे होते. याप्रसंगी शार्प इंडिया विजनेस सिस्टम्सचे हेड वसंत जोशी, महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, एमएसईवीचे अधीक्षक अभियंता सुनील माने, इंजिनीअर अजय मेहता, एमआयटीचे आकाश यावेळी सेडाचे प्रेसिडेंट आनंद येमूल यांनी, इलेक्ट्रोचे हे रौप्यमहोत्सवी वर्षे असून २४ वर्षापूर्वी २० स्टॉल्सने सुरु झालेले हे प्रदर्शन आज जवळपास ३०० स्टॉलसच्यावर पोहोचल्याचे सांगतिले. तसेच इलेक्ट्रो चेअरमन दीपक मुनोत यांनी यंदा क्यूआर कोडद्वारे सर्व सहभागी स्टॉल्सची माहिती ग्राहकांना आपल्या मोईबालवर पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे नमूद केले. तसेच काही स्टॉल्स सामाजिक संघटनांना विनामूल्य देण्यात आली असून या प्रदर्शनात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे व शेवटच्या सातव्या दिवशी दिवसांत खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी वंपर ड्रॉमध्ये आकर्षक वक्षिस असल्याची घोषणा करण्यात आली.या कार्यक्रमास सह सचिव हरीश कुकरेजा, खजिनदार सुयोग कालाणी, संस्थेचे माजी अध्यक्ष सतीश मालू, आनंदराज दोशी,दिलीप राऊत, समीर गांधी,विपीन कुलकर्णी, जितेंद्र राठी,कौशिक शाह, खुशाल देढीया, ईश्वर मालू तसेच संचालक संदेश कोठारी, राजेश जाजू, चंद्रकांत शाहपुरे, रवी पाचलगे, बसबराज नवले, यल्लपा भोसले, गणेश सूत्रावे, सदस्य विजय टेके, पवन मुंदडा, सचिन करवा, दत्तात्रय अंबुरे, जॉय छावरिया यांच्यासह ग्राहक उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थिताचे आभार सूरजरतन धूत यांनी मानले.
'इलेक्ट्रो'च्या पुस्तिकेचे प्रकाशन
'इलेक्ट्रो २०२५ ' या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. केक कापून आनंदही साजरा करण्यात आला. तसेच प्रदर्शनासाठी सहकार्य करणाऱ्या पुण्याच्या सुनील लोखंडे यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
0 Comments