छावा चित्रपटाचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जल्लोषात स्वागत.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आज बहुचर्चित छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील छावा चित्रपट सोलापुरातील सर्व चित्रपटगृह येथे प्रदर्शित करण्यात आला.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी फर्स्ट शो फर्स्ट डे या चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पोस्टरला पुष्पवृष्टी व फटाक्याची अतिशबाजी करून जल्लोष करण्यात आला यावेळी छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव च्या घोषणेने परिसर दुमदुमला होता.
या चित्रपटांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास मांडण्यात आला होता रयतेच्या स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले चित्रपटाला हे दृश्य पाहून अनेकांना गहिवरून आले होते तरी सोलापुरातील सर्वांनी सहकुटुंब हा चित्रपट पहावा असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले
0 Comments